घरच्या घरी लोणी व तूप कसे करावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत.
आपण घरी रोज दुध वापरतो. त्यापासून लोणी कसे काढायचे ते आपण बघू या. पण त्यासाठी म्हशीचे किंवा गाईचे दुध आवश्क आहे.
लोणी हे पचण्यास हलके असते. ते अमृता समान आहे. लोण्यामध्ये विलक्षण सामर्थ आहे. लोण्याचे सेवन नियमित करण्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले रहाते. त्यामुळे चष्मा लागत नाही. लोणी हे खोकल्यावर गुणकारी आहे व सर्दी सुद्धा होत नाही. ताजे लोणी हे शीतल, बुद्धीवर्धक व शरीराचा विकास करणारे आहे.
गाईच्या दुधा पासून बनवलेले लोणी हे हितकारी, वर्ण उजवणारे आहे, जुलाबात गुणकारी आहे. तसेच पित्त, रक्त दोष,खोकल्यावर गुणकारी आहे.
म्हशीच्या दुधापासून बनवलेले लोणी कफकारक असते, पचण्यास जड असते.
लोणी नेहमी ताजे वापरावे खूप दिवसाचे शिळे लोणी हे खारट, आंबट असते त्याच्या सेवनाने उलटी होऊ शकते तसेच कोड निर्माण करणारे असते. शिळे लोणी कधी खावू नये.
घरी लोणी बनवतांना :
रोज रात्री ताजे दुध तापवून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे. सकाळी दुधावर जाड मलई येते. ती मलई एका टोप मध्ये रोज काढून ठेवावी व तो टोप फ्रीजमध्ये ठेवावा. असे रोज आठ दिवस करावे. आठ दिवस झालेकी त्यामध्ये २ टे स्पून थोडे आंबट दही मिक्स करावे व एक दिवस टोप परत फ्रीजमध्ये ठेवावा.
दुसऱ्या दिवशी टोप बाहेर काढून मलई दुसऱ्या मोठ्या जाड बुडाच्या भांड्यात काढावी व रवीने लगेच घुसळून घ्यावे. थंड मलई असेलतर लोणी लगेच निघते. लोणी निघाल्यावर दोन वेळा चांगले धुवून घ्यावे. पाणी सर्व काढून घावे. मग कढवायला ठेवावे.
लोणी छान गुलाबी रंग येई परंत कढवावे. कढवताना चिमूटभर मीठ घालावे म्हणजे तूप छान रवाळ होते.
तूप झाल्यावर गाळणीने गळून घ्यावे.
टीप : मलई फक्त आठ दिवसच साठवावी जास्त दिवस झाले तर मलईला आंबूस वास येतो.
लोणी काढतांना मलई फ्रीज मधून काढून लगेच घुसलावी म्हणजे लोणी लगेच निघते.
लोणी कढवतांना गुलाबी रंग येई परंत कढवावे. म्हणजे छान खमंग सुवास येतो.