घरी दही -Dahi-Curds-Yogurt कसे बनवावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. : दही हे सर्वांना आवडते व ते किती पौस्टिक आहे ते आपणाला माहीत आहेच. दही हे चवीला रुचकर व गुणकारी आहे. दह्या पासून आपल्याला अनेक पदार्थ बनवता येतात. दही हे नेहमी ताजे वापरावे जरा जुने झालेले दही हे आंबट असते त्यामुळे आपल्या घशाला त्रास होण्याची शक्यता असते.
गाईच्या दुधापासून बनवलेले दही हे मधुर, थोडेसे आंबट, स्वादिस्ट व वायुनाशक आहे त्यामुळे गाईच्या दुधा पासून बनवलेले दही अधिक गुणकारी आहे.
म्हशीच्या दुधापासून बनवलेले दही हे स्निग्ध, कफकारक, जड व रक्त दुषित करणारे असते.
दही हे घरी बनवलेले कधीही गुणकारी असते. दह्यामध्ये थोडी साखर घालून सेवन केले तर पचनशक्ती वाढते. तसेच दह्यामध्ये मिरी पावडर व गुळ मिक्स करून सेवन केल्याने सर्दी बरी होते.
दह्यापासून आपल्याला घरी चक्का बनवून श्रीखंड बनवता येते.
दह्याचे सेवन नेहमी दिवसा करावे. रात्री दह्याचे सेवन करणे हितकारक नसते. जर रात्री दही सेवन करायचे असेल तर त्यामध्ये थोडेसे तूप, साखर व मध मिक्स करून मगच सेवन करावे.
दही बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
घरी दही कसे बनवावे ते आपण पाहुया.
साहित्य :
१ लिटर दुध (गाईचे किंवा म्हशीचे)
१ टे स्पून दही
कृती : दुध चांगले गरम करून घ्यावे. कोमट असतांना दुधावर साय येईल. मग दुधामध्ये एक टे स्पून दही मिक्स करून भांडे झाकून ठेवावे. दुसऱ्या दिवशी छान घट्ट दही तयार होईल.
दही लावतांना रात्री लावून ठेवावे म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळ परंत दही तयार होईल मग छान फ्रीजमध्ये थंड करायला ठेवावे. दुपारच्या जेवणापरंत थंड होईल.