अंड्याचे सॅंडविच Egg-Anda Sandwich: अंड्याचे सॅंडविच हे नाश्त्याला बनवता येते किंवा संध्याकाळी चहा बरोबर सद्धा करता येते. अंड्याच्या सॅंडविच मध्ये अंडे उकडून ते कुसकुरून त्यामध्ये मिरे पावडर, मीठ व बटर मिक्स करून ब्रेडला लावले आहे. ही सॅंडविच आपल्याला लहान मुलांना डब्यात सुद्धा देता येते किंवा कुठे ट्रीपला जातांना बरोबर न्यायला सुद्धा छान आहे. तसेच ह्यामध्ये मिरे पावडर वापरली आहे. त्यामुळे चवपण छान येते.
अंड्याचे सॅंडविच बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी : २ जणांसाठी
साहित्य:
१ अंडे
८ ब्रेडचे स्लाईस
२ टे स्पून बटर
१/४ टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
कृती: अंडे ५-७ मिनिटात उकडून घ्या. मग त्याचे टरकल काढून अंडे कुस्करून घ्या. त्यामध्ये मीठ, मिरे पावडर, १ टे स्पून बटर घालून चांगले मिक्स करून घ्या. व त्याचे ४ भाग करा.
ब्रेडच्या कडा कापून घेवून सर्व ब्रेड स्लाईसला एका बाजूनी थोडे बटर लावून घ्या. मग बटर लावलेल्या स्लाईसवर उकडलेल्या अंड्याचे मिश्रणाचा एक भाग लावून त्यावर दुसरी स्लाईस ठेवावी व हळुवारपणे स्लाईस दाबून घ्यावी व मध्ये कापून दोन सॅंडविच बनवावे. असे सर्व सॅंडविच बनवून घ्या.
जर ट्रीपला जातांना अंड्याचे सॅंडविच घेवून जायचे आहे तर ते कपडा ओला करून घट्ट पिळून घ्या मग त्यामध्ये सर्व सॅंडविच ठेवून मग स्टीलच्या डब्यात किंवा ब्रेड बॉक्स मध्ये ठेवून मग घेवून जा म्हणजे अगदी छान ताजे रहातात.
The English language version of the Egg Sandwich recipe is published in this – Article