बटाटा भजी : बटाट्याची भजी ही एक साईड डीश आहे. बटाटाचे पकोडे हे आपण जेवणामध्ये, नाश्त्याला करू शकतो. महाराष्ट्रात बटाटा भजी ही फार लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात जेव्हा गोडाचे जेवण बनवले जाते, तेव्हा बटाटा भाजी ही बनवलीच जातात. पुरणपोळीचे जेवण, श्रीखंड पुरीचे जेवण, खीर पुरीचे जेवण असले की बटाटा भाजी ही पाहिजेच. कारण ह्या मेनू बरोबर बटाटा भजी फार सुंदर लागतात.
बटाटा भजी बनवतांना त्यामध्ये ओवा घातला आहे, त्यामुळे भजाची चव फार छान लागते तसेच बेसन पचायला थोडे जड असते तर ओव्या मुळे पचायला थोडे हलके होते. कोथंबीर घातल्यामुळे भाजीची चव चांगली लागते. एक चिमुट सोडा घातला आहे त्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात.
बटाटा भजी बनवण्यासाठी वेळ : ४५ मिनिट
वाढणी : ४ जणांसाठी
साहित्य:
२ मध्यम आकाराचे बटाटे
१/२ टी स्पून मीठ
आवरणासाठी:
२ कप बेसन
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी हळद पावडर
१/२ टी स्पून ओवा (भरडून)
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
१ टे स्पून तेल (गरम कडकडीत)
एक चिमुट खायचा सोडा पावडर
तेल बटाटा भजी तळण्यासाठी
कृती:
बटाटे धुवून, त्याची साले काढून त्याच्या पातळ गोल चकत्या कापून घ्या.
एका भांड्यात थोडे पाणी व मीठ मिक्स करून त्यामध्ये बटाट्याच्या गोल चकत्या ५ मिनिट भिजत ठेवा. मग एका प्लेटमध्ये काढून घ्या.
एका भांड्यात बेसन, लाल मिरची पावडर, हळद, ओवा, कोथंबीर, मीठ, गरम तेल घालून मिक्स करून घ्या. पण थोडे पाणी घालून चांगले मिश्रण बनवून घ्या. मग त्यामध्ये सोडा घालून चांगले मिश्रण बनवून घ्या. मिश्रण थोडेसे पातळ करून त्यामध्ये बटाट्याच्या चकत्या घालाव्यात व मिक्स कराव्यात.
एका कढईमध्ये तेल चांगले गरम करून घ्यावे. त्यामध्ये ५-६ बटाट्याच्या बेसन मिश्रणातल्या चकत्या घालाव्या मग विस्तव मंद करून भजी दोन्हीं बाजूनी तळून घावीत. भजी छान कुरकुरीत तळून घ्यावीत.
गरम गरम भजी टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करावीत.
The English language version of the crisp Potato Pakora is published in this – Article