पनीर भुर्जी – पनीर भुर्जी ही डीश जेवणा मध्ये भाजी आयवजी बनवता येते. पनीर भुर्जी ही बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी डीश आहे. पनीर हे सगळ्यांना आवडते. तसेच ते पौस्टिक सुद्धा आहे. पनीर भुर्जी मध्ये थोडा कोबी (पत्ता कोबी) व शिमला मिर्च वापरली आहे. त्यामुळे भाजी जास्त सुद्धा होते व चवीला सुद्धा छान लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा ब्रेड बरोबर सुद्धा छान लागते. कधी भाजीच्या आयवजी पनीर भुर्जी करता येते. पनीर भुर्जी ही भाजी फार अगोदर करून ठेवू नये. जेवणाच्या वळेस बनवावी.
The English language version of this dish can be seen here – Simple and Tasty Paneer Bhurji
पनीर भुर्जी बनवण्यासाठी लागणारा वेळ : २० मिनिट
वाढणी : ४ जणांसाठी
साहित्य:
२५० ग्राम पनीर – घरी पनीर बनवण्या साठी बघा – घरगुती पनीर बनवण्याची कृती
१/२ कप कोबी
१/२ कप शिमला मिर्च (लाल-पिवळी-हिरवी)
१ मध्यम कांदा(चिरून)
१ छोटा टोमाटो (चिरून)
१ टी स्पून आले-लसूण पेस्ट किंवा बारीक चिरून
२-३ हिरव्या मिरच्या (चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून म मसाला
मीठ चवीने
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ टे स्पून तेल
कृती:
कांदा, टोमाटो, कोथंबीर, हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी. पता कोबी, शिमला मिर्च (लाल, पिवळी,हिरवी) चिरून घ्या. पनीर किसून घ्या. पण किसताना मोठी किसणी वापरा.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमाटो, आले-लसूण, कोबी, शिमला मिर्च, हिरवी मिरची घालून मिक्स करून थोडे परतून घ्या. म त्यामध्ये मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला घालून थोडे परतून घ्या. शेवटी किसलेले पनीर, कोथंबीर घालून थोडे परतून घ्यावे.
गरम गरम चपाती बरोबर किंवा ब्रेड बरोबर सर्व्ह करावे.