मटर करंजी – Green Peas Karanji : मटारची कारंजी म्हणजेच हिरवे ताजे मटरचे दाणे वापरून बनवलेली करंजी होय. मटारचा सीझन आला की आपण मटार वापरून वेगवेगळे पदार्थ बनवतो. मटारच्या करंज्या आपण नाश्त्याला किंवा घरी पार्टीला सुद्धा बनवू शकतो. ग्रीन पिज वापरून केलेली कारंजी अप्रतीम लागते. तसेच मटार हे खूप पौस्टिक आहेत. लहान मुलांना व मोठ्याना सुद्धा मटारचे पदार्थ आवडतात. महाराष्ट्रातील दिवाळीच्या फराळाच्या वेळीस बनवलेली बनवलेली कारंजी जसी लोकप्रिय आहे तसेच मटार वापरून बनवलेली कारंजी सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.
मटारच्या कारंजी मध्ये ताजे हिरवे मटार वापरून त्यामध्ये आले-लसून-हिरव्या मिरच्या, ओला नारळ, कोथंबीर, लिंबूरस वापरली आहे. त्यामुळे त्याची चव खूप छान लागते.
मटारच्या करंजीच्या आवरणासाठी मैदा, थोडा रवा व बेसन तसेच ओवा व जिरे भरड घातली आहे त्यामुळे करंजीच्या आवरणाला सुंदर टेस्ट येते. कडकडीत मोहन घातल्यामुळे छान कुरकुरीत होतात. The English language version can be seen here – Fried Green Karanji
मटारच्या करंज्या बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १५ करंज्या
साहित्य : सारणासाठी:
२ कप सोललेले मटारचे दाणे
१ टी स्पून तेल
१ टी स्पून लिंबू रस
१/४ कप ओला खोवलेला नारळ
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
आवरणासाठी
१ कप मैदा
१/२ कप रवा बारीक
१ टे स्पून बेसन
१ टी स्पून ओवा, जिरे (भरडून)
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून लाल मिरची पावडर
२ टे स्पून तेल (कडकडीत)
मीठ चवीने
तेल मटारची करंजी तळण्यासाठी
कृती: सारणासाठी:
एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात मटारचे सोललेले दाणे घाला. कढई वर झाकण ठेवून त्यावर पाणी घाला. मटर शिजवून घ्या. कढई मधून मटर काढून थोडेसे ठेचून घ्या. मग त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, लिंबूरस, मीठ व चवीला थोडीसी साखर, ओला खोवलेला नारळ, कोथंबीर घालून मिक्स करून घ्या. हे सारण तयार झाले.
आवरणासाठी: मैदा, रवा, बेसन, मीठ, ओवा-जिरे पूड, हळद, लाल मिरची पावडर मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये कडकडीत तेल घालून मिक्स करून पीठ थोडे घट्ट मळून घ्या. मळलेले पीठ १०-१५ मिनिट बाजूला ठेवा. मग त्याचे १५ एकसारखे गोळे करून घ्या.
एक गोळा घेवून पुरीच्या आकाराचा लाटून घ्या. मग त्यामध्ये एक टी स्पून सारण भरून पुरी मुडपून घ्या. पुरी मुडपल्यावर त्याला करंजीचा आकार द्या. अश्या सर्व करंज्या बनवून घ्या.
एका कढईमध्ये तेल चांगले गरम करून घ्या. गरम तेलामध्ये मटारच्या बनवलेल्या करंज्या गुलाबी रंगा तळून घ्या.
गरम गरम करंज्या टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
टीप: रवा, मैदा व बेसन वापरल्यामुळे ह्या करंज्या खूप छान व खुसखुशीत होतात. तसेच दिसायला पण खूप सुंदर दिसतात.
The Marathi language video of this Fresh Green Karanji can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=rNnfUWSYKUU