वालपापडीची भाजी – Field or Broad Bean Vegetable: वालपापडीची भाजी ही चवीला फार छान लागते. ही भाजी थोडीसी ओलसर बनवावी म्हणजे चांगली लागते. वालपापडी नेहमी कवळी वापरावी. ह्या भाजी मध्ये कांदा, आले-लसून काही नाही त्यामुळे बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. वालपापडी च्या भाजी मध्ये फक्त लाल मिरची पावडर, काळा मसाला, ओला नारळ वापरला आहे त्यामुळे भाजी चवीस्ट लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर चांगली लागते.
वालपापडीची भाजी बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
वाढणी: ३ जणासाठी
साहित्य:
२५० ग्राम वालपापडी
१/४ कप ओला नारळ (खोवून)
१/४ कप कोथंबीर (चिरून)
फोडणी साठी:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून काळा मसाला
मीठ चवीने
गुळ आवडत असल्यास चवीपुरता
कृती:
वालपापडीच्या शेंगाचे दोनी बाजूचे देठ काढून त्याची शिर पण काढावी व हाताने मोडून धुवून घ्यावी.
नारळ खोवून घ्यावा व कोथंबीर चिरून घ्यावी.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद व वालपापडी घालून मिक्स करावे. मग कढई वर झाकण ठेवून त्यावर पाणी घालावे. मंद विस्तवावर भाजी १०-१५ मिनिट शिजवून घ्यावी. भाजी शिजली की मीठ, लाल मिरची पावडर, काळा मसाला, गुळ, ओला नारळ, कोथंबीर घालून १/४ कप पाणी घालून एक चांगली वाफ आणावी.
वालपापडीची भाजी गरम गरम बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावी.
The English language version of the Broad Beans Maharashtrian Bhaji is published in this – Article