बीटरूट-गाजर कटलेट-Carrot Beetroot Cutlet: बीट-गाजर कटलेट ही एक जीवणातील तोंडी लावायची डीश होईल तसेच ती स्टारटर म्हणून सुद्धा करता येईल. बीटरूट व गाजर हे फार पौस्टिक आहे. आपण नेहमी सलाड म्हणून ह्याचा वापर करतो. बीटरूट-गाजर कटलेट हे चवीला चविस्ट लागतात. बीटरूट वापरल्यामुळे त्याचा रंगपण छान येतो. ह्यामध्ये गाजर व उकडलेले बटाटे वापरले आहे. बटाट्यामुळे ते छान एकजीव होते कटलेट ला घट्ट पणा येतो. व कुरकुरीत होतात. ह्यामध्ये फक्त आले-हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे लहान मुलांना खूप आवडतील.
The English Language version of this recipe can be seen here- Carrot Beetroot Cutlet
बीटरूट-गाजर कटलेट: बनवण्या साठी वेळ – ४५ मिनिट
वाढणी: २० कटलेट
साहित्य:
१ मोठ्या आकाराचे बीटरूट
१ मोठे लाल गाजर
४ मध्यम आकाराचे बटाटे
४-५ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१” आले तुकडा (बारीक चिरून)
३ ब्रेड स्लाईस
१ टी स्पून लिंबूरस
मीठ व साखर चवीने
१/४ कप कोथिंबीर
तेल कटलेट तळण्यासाठी
कृती:
बटाटे उकडून सोलून किसून घ्या. गाजर व बीटरूट धुवून, सोलून, किसून घ्या. ब्रेडचे स्लाईस मिक्सर मधून काढा. हिरवी मिरची व आले बारीक चिरून घ्या. कोथंबीर धुवून बारीक चिरून घ्या.
किसलेले बटाटे, गाजर, बीटरूट, हिरवी मिरची, आले, ब्रेडचा चुरा, मीठ, साखर, लिंबूरस, कोथंबीर मिक्स करून थोडे मळून घ्या. नंतर त्याचे छोटे २० गोळे बनवा. गोळे बनवल्यावर थोडे चपटे करा.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावून त्यावर कटलेट छान दोनी बाजूनी कुरकुरीत शालोफ्राय क्ररुन घ्या.
बीटरूट-गाजर कटलेट गरम-गरम टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.