झटपट खमंग मसालेदार बटाटे रस्सा: बटाट्याचे विविध प्रकार करता येतात व बटाटे सर्वांना खूप आवडतात सुद्धा. बटाटाच्या रस्सा हा जेवणात, पार्टीला, सणावाराला सुद्धा बनवता येतो. हा रस्सा भाकरी बरोबर सुंदर लागतो. हा रस्सा थोडा तिखट चांगला लागतो. आलूच्या रस्यामध्ये ओल्या नारळाचा मसाला वापरला आहे. त्यामुळे त्याची चव फार छान लागते. ह्या मध्ये हिरवे ताजे मटार, फ्लॉवरचे तुरे वापरता येतात त्यामुळे सुद्धा रस्सा चवीस्ट लागतो.
झटपट मसालेदार बटाटे रस्सा बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ मोठे बटाटे
१ मध्यम आकाराचा कांदा
१ छोटा टोमाटो
२ टे स्पून कोथंबीर
मीठ चवीने
मसाल्या करीता:
१/२ टे स्पून तेल
१ मध्यम आकाराचा कांदा
५-६ लसूण पाकळ्या
१/२” आले तुकडा
१ कप ओला नारळ (खोवून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
फोडणीसाठी:
१/२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
कृती:
मसाल्या करीता: कढईमधे तेल गरम करून कांदा, आले-लसून घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये ओला नारळ घालून मिक्स करून २-३ मिनिट परतून त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला घालून मिक्स करून एक मिनिट परतून घ्या. मग मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
बटाटे सोलून त्याच्या चौकोनी फोडी करून घ्या. कांदा, टोमाटो व कोथंबीर बारीक चिरून घ्या.
फोडणीसाठी: कढईमधे तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग घालून कांदा, टोमाटो, बटाट्याच्या फोडी घालून थोडे परतून घ्या मग कढईवर झाकण ठेवून झाकणावर पाणी घालून मंद विस्तवावर बटाटे शिजवून घ्या.
बटाटे शिजल्यावर त्यामध्ये हळद, मीठ, कोथंबीर व वाटलेला मसाला घालून २ कप पाणी घालून मंद विस्तवावर ५ मिनिट मसाला शिजवून घ्या.
गरम गरम बटाटे रस्सा चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the Spicy Potato Curry is published in this – Article