तिसऱ्यांचे खमंग कटलेट: तिसऱ्याचे (Clams) कटलेट हे खूप टेस्टी लागतात. हे कटलेट बनवताना तिसऱ्याचे शिंपले काढून आतला गर काढून घ्यावा. हे कटलेट जेवणामध्ये तोंडी लावायला फार छान आहेत. तसेच पार्टीच्या वेळेस स्टारटर म्हणून सुद्धा बनवायला चांगले आहेत. तिसऱ्यांचे कटलेट बनवण्यासाठी उकडलेला बटाटा, कांदा, आले-लसूण, हिरवी मिरची वापरली आहे व त्याला घट्ट पणा येण्यासाठी मैदा व रवा मिक्स केला आहे. वरतून रवा लावून शालो फ्राय केले आहेत त्यामुळे छान कुरकुरीत होतात. तसेच बनवायला पण सोपे आहेत व झटपट सुद्धा होतात.
ह्या आगोदर आपण तिसऱ्यांचे कालवण किंवा ग्रेव्ही बघितली आहे. तिसऱ्यांचे कटलेट बनवून बघा सगळ्यांना आवडतील.
तिसऱ्या आयवजी खुबे व कलवा यांचा वापर करू शकता.
तिसऱ्यांचे कटलेट बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप तिसऱ्याचा गर
१ कप ओला नारळ (खोवून)
१ मोठा बटाटा (उकडून)
१ मोठा कांदा (चिरून)
१ टे स्पून आले-लसूण (बारीक चिरून)
३ हिरव्या मिरच्या (चिरून)
१ टे स्पून रवा
१ टे स्पून मैदा
१/४ कप कोथंबीर (बारीक चिरून)
१/२ टी स्पून दालचिनी पावडर
१ टी स्पून लिंबू रस
तेल कटलेट शालो फ्राय करण्यासाठी
१/२ कप रवा (कटलेटला वरतून लावण्यासाठी)
कृती:
तिसऱ्या धुवून त्याचे वरचे आवरण काढून आतले मास काढून घ्या. नंतर थोडे शिजवून घ्या.
बटाटे उकडून किसून घ्या. कांदा व कोथंबीर बारीक चिरून घ्या. आले-लसून बारीक चेरुन घ्या.
एका बाऊलमध्ये उकडलेल्या तिसऱ्या, बटाटे, आले-लसून हिरवी मिरची. रवा. मैदा, कोथंबीर, दालचीनी पावडर, लिंबूरस, मीठ मिक्स करून त्याचे १२ एकसारखे गोळे बनवून मध्ये चपटे करा. मग रव्यामध्ये थोडे घोळून घ्या.
एका नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल लावून त्यावर सगळे चपटे गोळे लावून घ्या बाजूनी थोडे थोडे तेल सोडून छान कुरकुरीत फ्राय करून घ्या.
The English language version of the Clams Cutlets is published here – Spicy Clams Cutlets