चिकन रोल्स – Chicken Rolls: चिकन रोल्स हे मोगलाई रेस्टॉरंट सारखे बनतात. हे छान कुरकुरीत व चवीस्ट लागतात. चिकन रोल्स हे घरी पार्टीच्या वेळी बनवता येतात. तसेच ते स्टार्टर म्हणून किंवा कॉकटेल साठी सुद्धा बनवतात येतात.
The English language version of this recipe is published here – Tasty Chicken Keema Rolls
चिकन रोल्स बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य: सारणासाठी:
१ कप चिकन खिमा
१ मोठा कांदा (चिरून)
१ टी स्पून गरम मसाला
१ टे स्पून गरम मसाला
१ टे स्पून लिंबूरस
१/४ कप पुदिना पाने (चिरून)
मीठ चवीने
१/२ टे स्पून तेल
मसाला वाटण्यासाठी:
१/२ कप कोथंबीर
१/२ टे स्पून आले
१/२ टे स्पून लसून
१/२ टी स्पून हिरव्या मिरच्या
आवरणासाठी :
२ कप मैदा
१/२ टे स्पून तेल (गरम)
२ चिमुट खायचा सोडा
१/४ कप दुध
१/२ टी स्पून मिरे पावडर
१/४ टी स्पून हळद
मीठ चवीने
तेल चिकन रोल्स तळण्यासाठी
कृती: आवरणासाठी:
मैदा, मीठ, मिरे पावडर, हळद व गरम तेल घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये दुध घालून मिक्स करून कोमट पाणी वापरून पीठ घट्ट मळून घ्या व १९ मिनिट बाजूला ठेवा. मग त्याचे लिंबा एव्ह्डे गोळे करून घ्या.
सारणा साठी : कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालून २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. मग त्यामध्ये चिकन खिमा व वाटलेला मसाला घालून कोरडे होई परंत परतून घ्या. मग १/२ कप पाणी घालून मिक्स करून कढईवर प्लेट ठेवून १० मिनिट शिजवून घ्या. नंतर त्यामध्ये मीठ, लिंबूरस, पुदिना घालून मिक्स करून परत कोरडे होई परंत भाजून घ्या.
पिठाचा गोळा घेवून पुरी सारखा लाटून घ्या व त्यामध्ये १/२ टे स्पून शिजलेला खिमा पसरवून पुरी मुडपून घ्या व त्याचा रोल बनवा. असे सर्व रोल बनवून घ्या.
कढईमधे तेल गरम करून चिकन रोल छान कुरकुरीत तळून घ्या. टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.