बेसनाचा शिरा Besna Cha Sheera: बेसन म्हणजेच चना डाळीचे पीठ हे आपल्याला माहीत आहेच. बेसना पासून अनेक पदार्थ बनवता येतात व ते चवीस्ट पण लागतात. बेसनाचे लाडू, बेसनाची शेव, पाटवडी, कोथंबीर वडी, आळूवडी, भजी हे पदार्थ सर्वांचे आवडतीचे, असे बरेच पदार्थ बनवता येतात. तसेच बेसनाचा शिरा ही एक स्वीट डीश म्हणून बनवता येवू शकते. बेसनाचा शिरा हा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. ह्या शिऱ्यामध्ये थोडा ओला नारळ खोवून घातला आहे. त्यामुळे ह्याची चव चांगली लागते.
बेसनाच्या शिऱ्याच्या पोळ्या सुद्धा बनवता येतात व त्या चवीला सुंदर लागतात. अगदी पुरणपोळी सारख्या लागतात. पुरण बनवायला वेळ नसेल तर ह्या पोळ्या बनवता येत्तात. पुरणपोळीला पर्याय म्हणून ह्या पोळ्या छान आहेत.ह्याला झटपट पुरणपोळी सुद्धा म्हणता येईल.
The English language version of this recipe is published here – Besan Sheera
बेसनाचा शिरा बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप बेसन (चणाडाळ पीठ)
१/२ कप ओला नारळ (खोवून)
१/४ कप तूप
४ कप दुध
थोडे ड्रायफ्रुट
१ टी स्पून वेलचीपूड
कृती:
एका नॉनस्टिक कढईमधे निम्मे तूप गरम करून त्यामध्ये बेसन घालून चांगले खरपूस भाजून घ्या. मग त्यामध्ये ओला नारळ घालून परत थोडे परतून घ्या.
दुध गरम करून घ्या. मग भाजलेल्या बेसनामध्ये हळूहळू घालून ढवळत रहा. घट्ट व्हायला आले की कढईवर दोन मिनिट झाकण ठेवा. दोन मिनिट झाली की झाकण काढा व साखर, ड्रायफ्रुट व वेलचीपूड घालून हलवत रहा घट्ट झाले की शिरा तयार झाला.