खानदेशी शेंगदाणा चटणी: खानदेशी शेंगदाणा चटणी ही चवीला खूप टेस्टी लागते. तसेच ती खमंग पण लागते. आपण शेंगदाण्याची चटणी बनवतो ती कोरडी असते व ती ४-८ दिवस टिकते. जळगावची शेंगदाणा चटणी ही झटपट होणारी पण ही लगेच संपवावी लागते. ह्याला जळगावची शेंगदाणा चटणी असे म्हंटले आहे कारण जळगावमध्ये ही चटणी लोकप्रिय आहे. ही चटणी गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करतात. ही शेंगदाणा चटणी इडली, डोसा, उत्तपा बरोबर सुद्धा स्वदिस्ट लागते. तसेच ह्या चटणी मध्ये फक्त हिरवी मिरची व लसूण वापरले आहे.
The English language version of this Chutney preparation method is published here – Khandeshi Peanut Green Chilli Chutney
खानदेशी शेंगदाणा चटणी बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप शेंगदाणे (भाजलेले)
१० लसूण पाकळ्या
३-४ हिरव्या मिरच्या
२ टे स्पून कोथंबीर
मीठ चवीने
फोडणी साठी
१ टे स्पून तेल
कृती:
शेंगदाणे भाजून त्याची टरकले काढून घ्या. लसूण व कोथंबीर चिरून घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये हिरव्या मिरच्या अगदी एक मिनिट परतून घेवून मिरच्या काढून ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, लसूण, कोथंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ घालून अर्धा मिनिट मिक्सरमध्ये ग्राईड करून घ्या. मग त्यामध्ये १/२ कप पाणी घालून परत अर्धा मिनिट ग्राईड करून घ्या.
ग्राईड केलेली चटणी एका बाऊल मध्ये काढून घ्या व त्यामध्ये मिरची परतून घेतलेले तेल मिक्स करून घ्या.
गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करा.
The video in Marathi of this Khandeshi Shengdana Chatni can be seen ou our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=duFhZdZgH40