तिळ गुळाची पोळी खास मकरसंक्रांतीसाठी
तीळ-गुळाची पोळी: जानेवारी महिना चालू झालाकी पहिला सण म्हणजे मकर संक्रांत असते. महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या. तिळ-गुळाच्या पोळ्या. तिळाच्या चटणी, तिळाच्या भाकऱ्या बनवतात. तील-गुळाच्या पोळ्या छान खमंग लागतात. त्यावरती साजूक तूप घालून अजूनच छान लागते.
तीळ-गुळाची पोळी बनवतांना त्याच्या आवरणामध्ये थोडा मैदा व बेसन घातले आहे त्यामुळे पोळी छान खुसखुशीत होते.
तीळ-गुळाची पोळी बनवण्यासाठी वेळ: ९० मिनिट
वाढणी: १५ पोळ्या
साहित्य:
आवरणासाठी:
३ कप गव्हाचे पीठ (Wheat Flour)
१/२ कप मैदा (Refined Flour)
१/२ टे स्पून डाळीचे पीठ (बेसन) (Besan)
१/४ कप तेल (गरम) (Oil)
मीठ चवीने (Salt)
सारणासाठी:
१/२ कप तीळ (Sesame Seeds)
१/४ कप शेगदाणे (Peanuts)
१/४ कप सुके खोबरे किसून (Dry Coconut)
१/२ कप बेसन (Brsan)
२ टे स्पून तेल (Oil)
३ १/२ कप गुळ (किसून) (Jaggery)
१ टी स्पून वेलचीपूड (Cardamom Powder)
१/४ टी स्पून जायफळ पूड (Nutmeg Powder)
कृती:
आवरणासाठी: गव्हाचे पीठ, मैदा, बेसन, मीठ मिक्स करून त्यामध्ये तेल कडकडीत गरम करून घालून मिक्स करून घ्यावे मग त्यामध्ये थोडे थोडे पाणी घालून अगदी घट्ट पीठ मळून घ्यावे. मळलेले पीठ दीड ते दोन तास तरी भिजून द्यावे. मग त्याचे एक सारखे ३० गोळे करावेत.
सारणासाठी: तीळ मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. शेगदाणे खमंग भाजून त्याची साले काढून घ्यावी. सुके खोबरे किसून गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. मग भाजलेले तीळ, शेगदाणे, खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे.
बेसन तेलामध्ये चांगले मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. मग मिक्सरमध्ये बारीक केलेले तीळ, भाजलेले बेसन, वेलचीपूड, जायफळ व गुळ मिक्स करून घेवून सारण तयार करावे. सारण तयार झाल्यावर त्याचे एकसारखे १५ गोळे बनवावेत.
दोन पीठाचे गोळा घेवून दोन पुऱ्या लाटून घ्याव्यात एका लाटलेल्या पुरीवर एक सारणाचा गोळा ठेवून त्यावर दुसरी पुरी ठेवून बाजूनी कडा दाबून घ्याव्यात व तांदळाच्या पिठीवर पोळी लाटून घ्यावी.
sतवा गरम करून दोनी बाजूनी पोळी मंद विस्तवावर भाजून घ्यावी. अश्या सर्व पोळ्या बनवून घ्याव्यात.
गरम गरम गुळ पोळी वरतून सजून तूप घालून सर्व्ह करावी.