कुरकुरीत पालकची भजी: पालकचे पकोडे हे जेवणामध्ये किंवा नाश्त्याला बनवू शकतो. पालक हा पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच. पालक ह्या पालेभाजी मध्ये जीवनसत्व “ए”. “बी”, “सी”, “इ” तसेच प्रोटीन, व लोह आहे. पालक हा अत्यंत गुणकारी आहे. पालकची भजी छान कुरकुरीत व टेस्टी लागतात. ही भजी बनवतांना त्यामध्ये ओवा व तीळ वापरले आहेत. त्यामुळे भजी स्वादीस्ट लागतात. खायचा सोडा वापरला आहे त्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात.
The English language version of this Bhaji preparation method is published here – Palak Ke Pakode
साहित्य:
१२ पालकची मध्यम आकाराची पाने
आवरणासाठी:
२ कप बेसन (चणाडाळ पीठ)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद पावडर
१/४ टी स्पून ओवा (जाडसर कुटून)
१ टी स्पून तीळ
एक चिमुट खायचा सोडा
२ टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
तेल पालक भजी तळण्यासाठी
कृती:
पालकची पाने धुवून घेवून बाजूला ठेवा.
एका बाऊलमध्ये बेसन, लाल मिरची पावडर. हळद, ओवा, तीळ, खायचा सोडा, तेलाचे गरम मोहन घालून मिक्स करून पाणी घाला व मिश्रण थोडे पातळ भिजवा.
कढई मध्ये तेल गरम करून एक-एक पालकचे पान घेवून बेसनाच्या मिश्रणामध्ये घोळून पालकचे पान गरम तेलामध्ये सोडा व छान कुरकुरीत तळून घ्या. अशी सर्व पालकची भजी करून घ्या.
गरम गरम पालक भजी टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.