सुकी भेळ: भेळ हा अशी डीश आहे की तिचा कधी कंटाळा येत नाही. सुकी भेल पण चवीस्ट लागते. सुकी मुरमुरा भेळ बनवतांना कांदा, टोमाटो, कोथंबीर, कैरी, शेंगदाणे, हिरवी मिरची, लिंबूरस वापरला आहे तसेच चाट मसाला आहे त्यामुळे सुकी भेळ छान लागते.
सुकी भेळ आपण नाश्त्याला बनवू शकतो. आपल्याला कुठे छोट्या पिकनिकला जायचे असेल तेव्हा ही भेळ बरोबर नेऊ शकतो. लहान मुलांच्या पार्टीला सुद्धा बनवू शकतो. ही मुरमुरे भेळ लहान मुलांना खूप आवडेल.
The language version of this Bhel preparation method is published here – Jhatpat Crispy Chatpat Sukha Bhel
सुकी भेळ बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
४ कप चुरमुरे (मुरमुरे)
२ १/२ कप फरसाण
१ कप बारीक शेव
२ मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरून)
१ मध्यम आकाराचा टोमाटो (बारीक चिरून)
२ टे स्पून खारे दाणे
१ छोटी कैरी (सोलून बारीक चिरून)
१/४ कप कोथंबीर (बारीक चिरून)
१ मोठे लिंबू (रस काढून)
१/२ टी स्पून चाट मसाला
३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
मीठ चवीने
कृती:
कांदा. कोथंबीर, टोमाटो बारीक चिरून घ्यावी. कैरीची साले काढून बारीक चिरून घ्यावी.
एका मोठ्या भांड्यात मुरमुरे, फरसाण, खारे दाणे, थोडी शेव मिक्स करून घ्यावी. मग त्यामध्ये चिरलेला कांदा, कोथंबीर, कैरी, हिरवी मिरची, चाट मसाला मिक्स करून घ्यावी. मग मिक्स केलेले चुरमुरे, कांदा, कोथंबीर मिक्स करून लिंबूरस घालून मिक्स करून घ्या.
एका प्लेट मध्ये मिक्स केलेली भेळ घेवून वरतून कांदा. कोथंबीर, टोमाटो व बारीक शेव घालून सर्व्ह करावी.
ही भेळ फार अगोदर करून ठेवू नये. नाहीतर मऊ होऊन जाते. ती छान कुरकुरीत लागत नाही.