रॉयल पनीर-गुलकंद खीर: पनीर-गुलकंद खीर ही आपण सणावारी करू शकतो किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा करू शकतो. पनीर खीर बनवतांना त्यामध्ये गुलकंद वापरला आहे त्यामुळे ह्या खिरीला वेगळीच सुंदर चव येते व सुगंध पण खूप छान येतो. तसेच कॉर्नफ्लोअर वापरला आहे त्यामुळे खिरीला घट्ट पणा येतो. पनीर-गुलकंद खीर अप्रतीम लागते करून बघा नक्की आवडेल.
The English language version of this Kheer preparation method can be seen here – Paneer Rose Petal Jam Kheer
रॉयल पनीर-गुलकंद खीर: ३० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
१ लिटर दुध
१२५ ग्राम होममेड पनीर (होम मेड पनीर साठी रेसिपी बघा – Homemade Paneer)
१ टे स्पून गुलकंद (Rose Petal Jam)
१/४ कप साखर
२ टे स्पून कॉर्नफ्लोअर
१/२ टी स्पून वेलची पावडर
२-३ काजू
२-३ बदाम
कृती:
प्रथम दुध तापवून घ्या. मग त्यामध्ये साखर घालून १०-१५ मिनिट मंद विस्तवावर उकळून घ्या. मग त्यामध्ये कॉर्नफ्लोअर मिक्स करून २-३ मिनिट उकळी येवू द्या. मग दुध थंड करायला ठेवा.
पनीर किसून घ्या. काजू व बदामाचे बारीक तुकडे करा.
दुध थंड झाल्यावर त्यामध्ये किसलेले पनीर, गुलकंद, काजू-बदाम तुकडे वेलची पावडर घालून फ्रीजमध्ये २-३ तास थंड करायला ठेवा.
पनीर गुलकंद खीर थंड सर्व्ह करा. सर्व्ह करतांना ड्राय फ्रुटने सजवा.