न्युट्रीशियस पिझा मुलांसाठी: पिझा म्हंटले की लहान मुलांची आवडतीची डीश आहे. पिझा आपण वेगवेगळ्या प्रकारे बनवु शकतो. पिझा बेस हा मैद्या पासून बनवला जातो हे आपल्याला माहीत आहेच जर आपण पिझा बेस हा मैद्याच्या आयवजी पौस्टीक बेस म्हणजेच इडली किंवा डोसाचे पीठ वापरले आहे. न्युट्रीशियस पिझा बनवतांना ह्यामध्ये लाल गाजर, पत्ता कोबी, शिमला मिर्च, चीज व बटर वापरले आहे.
The English language version of this Pizza preparation method is given here – Zatpat Pizza
न्युट्रीशियस पिझा मुलांसाठी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ पिझा बनतात
साहित्य:
२ कप इडलीचे किंवा डोसाचे तयार पीठ
१ छोटे लाल गाजर (किसून)
१/४ कप पत्ताकोबी (किसून)
१/४ कप शिमला मिर्च (लाल, हिरवी, पिवळी बारीक चिरून)
१ हिरवी मिरची (बारीक चिरून)
३ चीज क्यूब (किसून)
३ टे स्पून टोमाटो सॉस
चीज व कोथंबीर सजवण्यासाठी
मीठ चवीने
३ टे स्पून बटर (पिझा भाजण्यासाठी)
कृती: इडली किंवा डोसा बनवायचे तयार पीठ घ्या. गाजर किसून, पत्ताकोबी व शिमला मिर्च बारीक चिरून), हिरवी मिरची बारीक चिरून, कोथंबीर बारीक चिरून घ्या. चीज किसून घ्या.
डोश्याच्या तयार पिठामध्ये किसलेले गाजर, बारीक चिरलेला पत्ताकोबी, शिमला मिर्च, हिरवी मिरची व मीठ घालून मिक्स करून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर थोडे बटर लावून एक डाव मिश्रण घेवून थोडेसे पसरा (जरा जाडसर) बाजूनी थोडे बटर घालून पिझा वरती ३/४ टे स्पून टोमाटो सॉस पसरवून त्यावर किसलेले चीज घालून झाकण ठेवा व मंद विस्तवावर ४-५ मिनिट बेक करा. झाकण काढून पिझा उलट करून परत थोडे बटर घालून दोन मिनिट बेक करून घ्या.
गरम गरम पिझा सर्व्ह करा. सर्व्ह करतांना वरतून किसलेले चीज व कोथंबीर घालून सजवा.