रॉयल काश्मिरी कावा/ कहवा टी: काश्मिर म्हंटले की तेथील सुष्ट्रीसौदर्य व कश्मीर मधील थंडी सुद्धा आठवते. कश्मीरमध्ये खूप थंडी असते त्यामुळे तेथील रहिवासी थंडी कमी करायला कावा/ कहवा म्हणजेच आपल्या भाषेत मसाला चहा बनवतात. ह्या मसाला चहाची चव अगदीच निराळी लागते. तसेच त्यामध्ये दालचीनी, केसर, हिरवे वेलदोडे, मीठ, खायचा सोडा व साखर वापरlली आहे त्यामुळे ह्या चहाचा एक सीप सुद्धा आपल्या शरीरातील थंडी कमी करण्यास मदत करतो.
आम्ही काही वर्षापूर्वी काश्मीरला गेलो होतो. तेथील सुष्ट्रीसौदर्य बघून आम्ही थक्कच झालो तसेच तेथे थंडी सुद्धा खूप होती. तेव्हा आम्ही काश्मिरमध्ये कावा टेस्ट केला आम्हाला खूप आवडला. काश्मिरी चहाची पावडर कुठे सुद्धा मार्केट मध्ये सहज उपलब्ध होते.
The English language version of this recipe is published here- Rich Kashmiri Kahwa Tea
रॉयल काश्मिरी कावा/ कहवा चहा बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य:
२ कप पाणी (Water)
२ टी स्पून साखर (Sugar)
१ टी स्पून काश्मिरी चहा पावडर (Green Tea)
४ हिरवे वेलदोडे (Cardamom)
१/२” दालचीनी तुकडा (Cinnamon)
एक चिमुट खायचा सोडा (Soda-bi-carb)
एक चिमुट मीठ (Salt)
५-६ काड्या केशर (Saffron)
२ बदाम (पावडर) (Almonds)
कृती:
पाणी, साखर, वेलदोडे, दालचीनी, काश्मिरी चहा, मिक्स करून ३-४ मिनिट मध्यम आचेवर उकळून घ्या. मग त्यामध्ये मीठ व सोडा घालून मिक्स करून एक मिनिट गरम करून गाळून घ्या.
गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना चहाच्या वर केसर व बदाम पावडरने सजवा मग सर्व्ह करा.