नारळाची ऑरेंज बर्फी: नारळाचे आपण बरेच पदार्थ बनवतो. नारळाच्या वड्या, मोदक, लाडू अजून बरेच पदार्थ बनवता येतात. नारळाची ऑरेंज बर्फी ही आपण सणावाराला किंवा दिवाळी फराळाला सुद्धा बनवू शकतो. ही बर्फी बनवायला फार सोपी आहे व झटपट सुद्धा होणारी आहे. ही बर्फी बनवतांना ऑरेंज बुंदी लाडू मिक्स केला आहे. त्यामुळे ही बर्फी आकर्षक व सुंदर दिसते व चवीला पण फार छान लागते.
The English language version can be seen here – Rich Coconut Narangi Burfi
नारळाची ऑरेंज बर्फी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: २५ वड्या
साहित्य:
१ कप नारळ (खोवलेला)
१ केशरी बुंदी लाडू
३/४ कप साखर
१ कप दुध
१ टी स्पून वेलची पूड
१ टे स्पून पिठीसाखर
४ बदाम सजावटीसाठी (तुकडे करून)
१ टी स्पून तूप
कृती: एका कढईमधे खोवलेला नारळ, दुध मिक्स करून मंद विस्तवावर आटवायला ठेवा. थोडे घट्ट झाले की त्यामध्ये साखर व बुंदी लाडू चुरा करून घालून अगदी घट्ट होईपरंत आटवून घ्या. मग त्यामध्ये वेलची पूड घालून परत मिक्स करा.
एका मध्यम आकाराच्या स्टीलच्या प्लेटला तूप लावून त्यावर मिश्रण एक सारखे थापून घ्या. मग त्यावर बदामाच्या कापानी सजवून वड्या कापून घ्या.