मटार खस-खसची भाजी: मटार खस-खसची भाजी स्वादीस्ट लागते. हिरवे मटार हे आपल्या आहारात उत्तम समजले जातात. तसेच खस-खस ही आपण नेहमी मसाल्यामध्ये वापरतो. त्याची भाजी जर बनवली तर अगदी उत्कृष्ट लागते. ही भाजी बनवतांना खस-खसचे दाणे आधी दोन तास भिजत घालायचे म्हणजे ते छान भिजतात व त्याची भाजी चांगली मऊ बनते. ह्या मध्ये हिरवे ताजे मटार घालून सुद्धा भाजी चवीस्ट लागते.
The English language version is published here – Maharashtrian Green Peas Poppy Seeds Bhaji
मटार खस-खसची भाजी: बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जण
साहित्य:
२ कप खस-खस (Poppy Seeds)
१/४ कप हिरवे मटार दाणे (Green Peas)
२ मध्यम आकाराचे कांदे (चिरून)
२-३ हिरव्या मिरच्या (चिरून)
२ टे स्पून कोथंबीर
२ टे स्पून ओला नारळ (खोवून)
मिरे पावडर चवीने
मीठ व साखर चवीने
१ टे स्पून साजुक तूप
फोडणी करता
१ टे स्पून तेल
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हळद पावडर
कृती
खस-खस दोन तास पाण्यात भिजत घाला (पाणी खस-खस बुडेल इतपत घाला). कांदा, हिरव्या मिरच्या, कोथंबीर चिरून घ्या. ओले खोबरे खोवून घ्या.
एका कढईमधे खस-खस, मटार व एक कप पाणी घालून १० मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. मग शिजवलेली खस-खस बाजूला काढून ठेवा.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा, हिरव्या मिरच्या घालून दोन मिनिट परतून घ्या मग त्यामध्ये हळद, मीठ, शिजवलेली खस-खस घालून ५ मिनिट शिजवून घ्या. मग त्यामध्ये कोथंबीर, ओले खोबरे, साखर, मिरे पावडर घालून मिक्स करून एक मिनिट परतून घ्या. वरतून तूप घालून मिक्स करून घ्या.
गरम गरम खस-खसची भाजी चपाती, पराठा किंवा तांदळाची भाकरी बरोबर सर्व्ह करा.