अननस चीज सलाड: अननस चीज सलाड ही एक फार चवीस्ट व दिसायला पण फार सुंदर दिसते. आपल्या घरी जेव्हा पार्टी असेल तेव्हा बनवा सगळ्यांना आवडेल. अननसामुळे सलाडला खूप छान सुगंध येतो व छान आंबटगोड चव पे येते. तसेच ह्यामध्ये काकडी व शिमला मिर्च वापरली आहे त्यामुळे छान रंगीत सलाड दिसते.
अननस चीज सलाड बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य
२ कप अननसाचे मध्यम आकाराचे तुकडे
१ कप काकडीचे मध्यम आकाराचे तुकडे
३/४ कप शिमला मिर्च मध्यम आकाराचे तुकडे
१ कप चीजचे मध्यम आकाराचे तुकडे
५-६ लसून पाकळ्या पेस्ट
१ टे स्पून लिंबूरस
मिरे पावडर, लाल मिरची पावडर, साखर व मीठ चवीने
२ टे स्पून तेल
कृती:
अननस सोलून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. काकडी सोलून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करा. शिमला मिर्चचे मध्यम आकाराचे तुकडे करा. चीजचे पण मध्यम आकाराचे तुकडे करा.
लसून पेस्ट, लिंबूरस, लाल मिरची पावडर, साखर, मीठ व चीजचे तुकडे मिक्स करून फ्रीझमध्ये १०-१५ मिनिट ठेवा. नंतर कढईमधे तेल गरम करून चीजचे तुकडे गुलाबी रंगावर परतून घेवून मग बाजूला काढून ठेवा. कढईमधे राहिलेल्या तेलामध्ये अननसाचे तुकडे, काकडीचे तुकडे, शिमला मिर्च थोडी परतून घ्या.मग सर्व मिक्स करून वरतून मिरे पावडर मिक्स करून मग सर्व्ह करा.