काळ्या द्राक्षांचे ज्यूस: काळी द्राक्षे ही चवीला फार छान लागतात. तसेच ती पौस्टिक व औषधी सुद्धा आहेत. काळ्या द्राक्षांचे ज्यूस बनवतांना त्यामध्ये फक्त साखर व लिंबूरस मिक्स केला आहे. त्याचे ज्यूस बनवतांना द्राक्षे जर जास्त पिकलेली असतील किंवा थोडी नरम द्राक्षे सुद्धा चालतील. नरम पडलेली द्राक्षे नुसती खायला आवडत नाही तर त्याचे ज्यूस बनवावे. लहानमुले हे ज्यूस आवडीने पितात. तसेच ह्यामध्ये थोडेसे मीठ मिक्स केले तर त्याची टेस्ट अजून छान लागते. ज्यूस बनवतांना द्राक्ष, साखर, मीठ व पाणी एकत्र करून ब्लेंड करावे व गाळून थंड करून मग सर्व्ह करावे. तसेच आपल्याला हिरव्या द्राक्षांचे सुद्धा ज्यूस बनवता येते. हिरव्या द्राक्षाचे ज्यूस बनवतांना हीच पद्धत आहे.
The English Language version of this grapes juice recipe can be seen here – Kale Angoor Ka Taza Juice
काळ्या द्राक्ष्याचे ज्यूस बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
५०० ग्राम काळी द्राक्ष
२ टे स्पून साखर
१ टी स्पून लिंबूरस
मीठ चवीने
८-१० बर्फाचे क्यूब
१ कप पाणी
कृती:
द्राक्षे स्वच्छ धुवून घ्या. मग ब्लेडरमध्ये द्राक्ष, साखर, मीठ व थंड पाणी घालून एक मिनिट ब्लेंड करून घ्या.
एक चाळणी घेवून ब्लेंडर मधील मिश्रण गळून घ्या. मग त्यामध्ये लिंबूरस घालून मिक्स करून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा
ज्यूस थंड झाल्यावर मग सर्व्ह करतांना आईस क्यूब घालून मग सर्व्ह करा.