कँनटोनीज पुलाव: कँनटोनीज पुलाव हा चायनीज फ्राईड राईसचा एक प्रकार आहे. कँनटोनीजही एक जागा आहे ती चायना मध्ये आहे तेथील हा राईस लोकप्रिय आहे. ह्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत. हा राईस बनवायला सोपा व लवकर होणारा आहे.
The English language version of this fried rice dish preparation method is published here – Famous Cantonese Fried Rice
कँनटोनीज पुलाव बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य:
१ कप बासमती तांदूळ
१/२ कप मुश्रूम (चकत्या कापून घ्या)
१/४ कप गाजर (उभे पातळ चिरून),
१/४ कप फ्रेंच बीन्स (उभ्या पातळ चिरून)
१/४ कप कांदा पात (चिरून)
१ टे स्पून तेल
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
१ टे स्पून टोमाटो सॉस
१ टी स्पून पांढरी मिरे पावडर
अजिनोमोटो व मीठ चवीने
कृती: मोकळा भात शिजवून घ्या व थंड करायला ठेवा.
कढईमध्ये तेल गरम करून आले-लसूण पेस्ट, मश्रूम, गाजर, फ्रेंच बीन्स घालून २-३ मिनिट फ्राय करून घ्या. मग त्यामध्ये अजिनोमोटो, मीठ, टोमाटो सॉस मिक्स करून परतून घेऊन त्यामध्ये शिजवलेला भात, पांढरी मिरे पावडर मिक्स करून पाच मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या.
कांदा पात चिरून त्याने सजवा व सर्व्ह करा.