गाजर-नाचणी कारंजी: गाजर-नाचणी कारंजी ही एक स्टारटर रेसीपी म्हणून करता येईल. गाजर हे हेल्दी आहेच त्याबरोबर नाचणी पण हेल्दी आहेच हे आपल्याला माहीत आहेच. लहान मुलांना ही कारंजी दुपारी दुधाबरोबर देता येईल. ही कारंजी बनवतांना करंजीचे आवरण नाचणीचा आटा वापरला आहे तसेच करंजीचे सारणासाठी गाजर, चीज व मिरे पावडर वापरली आहे. ही एक टेस्टी रेसीपी आहे.
The English language version preparation method of this Karanji recipe is published here – Nachni Gajar Karanji
गाजर-नाचणी कारंजी बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २० करंज्या
साहित्य:
आवरणासाठी:
१ कप नाचणी आटा
१ कप मैदा
१ टे स्पून तेल (गरम)
मीठ चवीने
२ टे स्पून दुध
तेल कारंजी तळण्यासाठी
सारणासाठी:
२ मोठे लाल गाजर (किसून)
२ चीज क्युब
मिरे पावडर व मीठ चवीने
कृती:
आवरणासाठी:
नाचणी आटा, मैदा, मीठ व गरम तेल घालून मिक्स करून थोडे पाणी वापरून घट्ट पीठ मळून घेवून २० मिनिट बाजूला ठेवा. मग मळलेल्या पीठाचे २० गोळे बनवून घ्या.
सारणासाठी:
गाजर धुवून, किसून घ्या. चीज किसून घ्या. मग किसलेले गाजर, चीज, मिरे पावडर, मीठ मिक्स करून सारण बनवून घ्या.
करंजी बनवतांना मळलेल्या पिठाचा एक गोळा घेवून पुरी सारखा लाटावा. पुरीला बाजूनी दोन थेंब दुध लावून मग त्यामध्ये एक टे स्पून गाजराचे सारण ठेवून पुरी मुडपून घेवून त्याला करंजीचा आकार द्यावा. अश्या सर्व करंज्या बनवून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये करंज्या छान क्रिप्सी होईपरंत तळून घ्या.
गरम गरम कारंजी टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.