होळीचे महत्व: आपल्या मराठी महिन्याप्रमाणे होळी फाल्गुन महिन्यात व इंग्लिश महिन्या प्रमाणे मार्च महिन्यात येते.
होली हा सण पूर्ण भारतात उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रात व उत्तर प्रदेशात ह्याचे खूप महत्व आहे. ह्या दिवसाला फाल्गुन पौर्णिमा असे म्हणतात. ह्या दिवशी होळीची पूजा करतात. खरम्हणजे थंडी संपून वसंत ऋतूचे आगमन होते. त्याच्या निमिताने हा एक सार्वजनिक सण साजरा केला जातो. प्रतेकजण ह्या मध्ये भाग घेतात.
महाराष्ट्रात होळी पेटवली जाते. होळीची पूजा केली जाते. होळीची पूजा संध्याकाळी अंधार पडल्यावर केली जाते. ज्या ठिकाणी होळी मांडायची आहे ती जागा स्वच्छ करून शेणानी सारवून घ्यावी. मग मध्य भागी झाडाच्या वाळलेल्या फांद्या लाकडे उभी रचून ठेवावी. मध्यभागी अख्खा उस ठेवावा. गौऱ्या सुद्धा ठेवाव्यात. रचलेल्या होळीच्या बाजूनी छानशी रांगोळी काढावी. होळीला फुलांचा हार घालावा. होळी पेटवण्यासाठी विस्तव वाजत गाजत आणला जातो. होळी पेटवून होळीची सुवासिनी हळद कुंकू वाहून पूजा करतात. तांब्याच्या तांब्यात पाणी घेवून हळूहळू पाणी सोडून होळीला पाच प्रदक्षिणा मारल्या जातात व होळीमध्ये नारळ सोडला जातो. लहान मुले डफ, डमरू, ढोल वाजवून मजा करतात.
महाराष्टात होळीच्या दिवशी पुरणपोळी बनवून त्याचा होळीला नेवेद्य दाखवला जातो.
दुसऱ्या दिवशी होळी दुध व पाणी शिंपडून वीजवली जाते. होळीची राख अंगाला लावून मग आंघोळ केली जाते. त्यामुळे मानसिक चिंता नष्ट होवून मनस्वाथ लाभते.
दुसऱ्यादिवशी घुलीवंदन हा सण असतो. ह्या दिवशी एकमेकांच्या घरी जावून एकमेकांना रंग लावतात व आपसातली भाडणे मिटवून परत मैत्रीचे संबंध कायम केले जातात.
उत्तर प्रदेशात हा सण सर्वात मोठा समजला जातो. त्यादिवशी घरी पक्वाने बनवली जातात. गुजीया हा त्याचा महत्वाचा गोड पदार्थ बनवला जातो. गुजीया म्हणजे महाराष्टातील करंज्या होय.
ह्या दिवशी भांग बनवून धुलीवंदन हा सण साजरा करतात. लहान मुल व मोठे सुद्धा हा सण आनंदाने साजरा करतात.