स्ट्रॉबेरी पूरण पोळी: आपण चणाडाळ. मुगडाळ वापरून पुरण पोळी बनवतो. स्ट्रॉबेरी पुरण पोळी बनवून बघा. चवीला खूप छान लागते. तसेच ह्या पुरण पोळीचा सुंगध पण खूप छान येतो. स्ट्रॉबेरी वापरल्यामुळे पोळीचा रंग सुद्धा खूप छान येतो. ह्या पोळीचे सारण बनवताना फ्रेश स्ट्रॉबेरी वापरल्या आहेत. स्ट्रॉबेरी थोड्याश्या शिजवून घेतल्या आहेत. हे सारण बनवायला अगदी सोपे आहे. तसेच ही पुरण पोळी वेगळीच लागते. नाहीतरी मुलांना काहीतरी वेगवेगळ्या टेस्टी रेसिपीज लागत असतात.
The English language version of the Strawberry Puran Poli preparation method can be seen here – Tasty Strawberry Puran Poli
स्ट्रॉबेरी पुरण पोळी बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १५ पोळ्या बनतात
साहित्य: आवरणा साठी
१ १/२ कप गव्हाचे पीठ
१ १/२ कप मैदा
१ टे स्पून तेल
मीठ चवीने
सारणासाठी
२ कप रवा (बारीक)
१0-१२ ताज्या स्ट्रॉबेरी (तुकडे करून)
२ टे स्पून तूप
१ १/२ साखर
२ कप दुध
२ कप पाणी
१ टी स्पून वेलचीपूड
साजूक तूप पोळीला वरतून लावण्यासाठी
कृती:
आवरणासाठी: गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, गरम तेल मिक्स करून थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. मग त्याचे १५ एकसारखे गोळे बनवा.
सारणासाठी: कढईमधे स्ट्रॉबेरीचे तुकडे घेवून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये दोन टे स्पून पाणी घालून परत एक मिनिट शिजवून घ्या व बाजूला काढून ठेवा.
कढईमधे तूप गरम करून रवा घालून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. भाजलेला रवा एका प्लेट मध्ये काढून घ्या.
मग कढईमध्ये दुध व पाणी गरम करून त्यामध्ये भाजलेला रवा घालून मंद विस्तवावर पाच मिनिट शिजवून घ्या. मग त्यामध्ये साखर, वेलचीपूड, शिजवलेल्या स्ट्रॉबेरी घालून मिक्स करून पाच मिनिट शिजवून घ्या. थंड झाल्यावर त्याचे १५ भाग करून घ्या.
पुरणपोळी बनवताना: एक पीठाचा गोळा घेवून पुरी सारखा लाटून घ्या. मग त्यामध्ये सारणाचा एक भाग ठेवून पुरी बंद करून लाटून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर पोळी छान दोनी बाजूनी भाजून घ्या. अश्या सर्व पोळ्या बनवून घ्या.
स्ट्रॉबेरी पुरणपोळी सर्व्ह करतांना तूप घालून गरम गरम सर्व्ह करा.