टोमाटोचा पराठा: टोमाटोचा पराठा हा चवीला उत्कृष्ट लागतो. मुलांना डब्यात द्यायला छान आहे. ह्या पराठ्यामध्ये टोमाटोचा स्वाद चागला लागतो. नाश्याला बनवायला पण छान आहे. ज्यांना टोमाटो आवडतात त्यांना हा पदार्थ नक्की आवडेल. कमी वेळात झटपट बनतो.
The English language version of this Paratha preparation method can be seen here – Tomato Paratha
टोमाटोचा पराठा बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ पराठे
साहित्य:
३ कप गव्हाचे पीठ
१ कप मैदा
१ मोठा कांदा
६ हिरव्या मिरच्या
३ मोठे टोमाटो
१ टी स्पून जिरे पावडर
मीठ चवीने
२ टे स्पून तेल (गरम)
तूप पराठ्याला वरतून लावायला
तेल पराठा भाजायला
कृती:
टोमाटो चिरून घ्या व मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. कांदा किसून घ्या. हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. जिरे कुटून घ्या.
गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, किसलेला कांदा, टोमाटो, हिरवी मिरची, जिरे, गरम तेल घालून पीठ मळून घ्या.
एक एक गोळा घेवून घडीच्या चपाती प्रमाणे लाटून घेऊन दोन्ही बाजूनी तेलावर खरपूस भाजून घ्या.
गरम गरम पराठा तूप घालून सर्व्ह करा.