कोफ्ता पुलाव: कोफ्ता पुलाव हा पार्टीला अथवा सणावाराला बनवता येतो. ह्या पुलावाची चव छान लागते. तसेच ह्या मध्ये भाज्या सुद्धा वापरलेल्या आहेत. कोफ्ता पुलाव बनवायला सोपा आहे व लहान मुले आवडीने खातात. कोफ्ते हे उकडलेले बटाटे व हिरवे ताजे मटार वापरून बनवले आहेत. कोफ्ता पुलाव हा दिसायला पण आकर्षक दिसतो.
This English language version of this Kofta Pulao Rice Dish can be seen here – Matar Batata Kofta Pulao
कोफ्ता पुलाव बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप तांदूळ (बासमती)
१/२ कप गाजर (उभे पातळ चिरून)
१/४ कप हिरवे ताजे मटार
२ मोठे कांदे (उभे पातळ चिरून)
मीठ चवीने
कोफ्त्यासाठी:
२ मोठे बटाटे
१ टे स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट
१/४ कप हिरवे मटार (थोडे वाटून)
२ टे स्पून कॉर्न्र फ्लोर
१ टे स्पून मैदा
तूप कोफ्ते तळण्यासाठी
मीठ चवीने
फोडणी साठी:
२ टे स्पून तेल
१ टी स्पून जिरे
४ हिरवे वेलदोडे
२ तुकडे दालचीनी
४ लवंगा
७-८ काजू
कृती:
तांदूळ धुवून बाजूला ठेवा. कांदा उभा पातळ चिरून तळून घ्या. गाजर उभे पातळ काप करून घ्या. मटार मिक्सरमध्ये थोडासा वाटून घ्या.
बटाटे उकडून, सोलून, किसून, त्यामध्ये आले-लसूण पेस्ट, कॉर्न्र फ्लोर, मैदा, वाटलेले मटार, मीठ घालून मिक्स करून त्याचे लहान गोळे बनवा. तूप गरम करून गोळे ब्राऊन रंगावर तळून घ्या.
एका जाड बुडाच्या भांड्यात तेल गरम करून त्यामध्ये जिरे, वेलदोडे, दालचीनी, लवंगा, काजू, मीठ, मटार, गाजर घालून तांदूळ २-३ मिनिट परतून घ्या. मग ४ कप गरम पाणी घालून मिक्स करून भात शिजवून घ्या.
गरम गरम भात सर्व्ह करा. सर्व्ह करतांना कोफ्ते घालून व तळलेला कांदा घालून सर्व्ह करा.