चिकन टेम्पुरा: चिकन टेम्पुरा हा एक स्टारटर चा प्रकार आहे. चिकनचे अनेक प्रकार बनवता येतात. त्यातला हा एक चवीस्ट पदार्थ आहे. चिकन टेम्पुरा बनवायला जास्त वेळ लागत नाही कोणी पाहुणे येणार असेल तर हा पदार्थ कमी वेळात लवकर होणारा आहे. चिकन तेम्पुरा छान खमंग लगतात.
The English language version of this chicken dish preparation method can be seen here – Crisp Fried Tempura
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
Marinate वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१६ बोनलेस चिकनचे तुकडे
२ टे स्पून रवा
२ टे स्पून कॉर्नफ्लोर
१ टे स्पून टेम्पुरा पावडर
तेल तळण्यासाठी
Marinate करण्यासाठी:
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
२ टे स्पून दही
२ टी स्पून काश्मिरी लाल मिरची पावडर
१ टी स्पून हळद पावडर
१५ कडीपत्ता (चिरून)
१ टी स्पून काळे मिरे पावडर
१ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
कृती:
चिकनचे तुकडे धुवून घ्या मग त्याला आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, काळे मिरे पावडर, कडीपत्ता चिरून, मीठ व दही घालून मिक्स करून फ्रीझमध्ये ३० मिनिट ठेवा.
कॉर्नफ्लोर, रवा व टेम्पुरा पावडर मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये चेकनचे तुकडे घोळून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घ्या. गरम तेलामध्ये चिकनचे तुकडे ब्राऊन रंगावर तळून घ्या.
गरम गरम चिकन टेम्पुरा सर्व्ह करा.