बटरस्कॉच आईसक्रिम अंडे न वापरता: आईसक्रिम हे कोणत्यापण सीझनमध्ये करता येते. उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा असो कोणत्यापण सीझनमध्ये आईसक्रिम छान लागते. बटरस्कॉच आईसक्रिम हे चवीला खूप छान लागते. हे आईसक्रिम बनवताना आगोदर बेस बनवला आहे बेस बनवून ठेवला की आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा कोणत्यापण आईसक्रिमचा फेव्हर दोन तासात बनवता येतो. जेव्हडा पाहिजे तेव्हडा बेस वापरून आईसक्रिम बनवावे.
बटरस्कॉच आईसक्रिम बनवतांना मध, पिवळा रंग व बटरस्कॉच ईसेन्स वापरला आहे. तसेच ह्या आईसक्रिम मध्ये साखरेचे खडे म्हणजे प्रोलेन वापरले आहे त्यामुळे आईसक्रिम खाताना मधून मधून क्रंची साखरेचे खडे लागतात ते फार छान लागतात.
The English language version of this Ice Cream preparation method can be seen here – Homemade Eggless Butterscotch Ice Cream and Praline
बेसिक आईसक्रिम बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
फ्रीजमध्ये सेट करण्याचा वेळ: ७-८ तास
बटरस्कॉच आईसक्रिम बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
फ्रीझमध्ये सेट करण्यासाठी वेळ: २ तास
वाढणी: ह्या बेसमध्ये १०-१२ जणांसाठी बनते
बेसिक साठी:
२ कप दुध (गाईचे)
१ १/२ टे स्पून कॉर्नफ्लोर
१ १/२ टे स्पून GMS पावडर
७ टे स्पून साखर
१/८ टी स्पून Stabilizer पावडर
२ टे स्पून मिल्क पावडर
बटरस्कॉच आईसक्रिम साठी:
१/२ कप क्रीम
१ टे स्पून मध
१/४ टी स्पून पिवळा खाण्याचा रंग
१ टी स्पून बटरस्कॉच ईसेन्स
प्रेलाईन साठी:
प्रेलाईन म्हणजे बटर स्कॉच आईसक्रिम साठी साखर जाळून (डार्क ब्राऊन) करून त्याचे तुकडे आईस्क्रीम मध्ये मिक्स करायचे. आईसक्रिम खाताना ते तुकडे छान क्रंची लागतात.)
१/२ टी स्पून तूप
१/४ कप साखर
४ बदाम (तुकडे करून)
४ काजू (तुकडे करून)
कृती:
बेसिक आईस्क्रीम साठी: एक कप दुध गरम करायला ठेवा. दुसऱ्या एक कप दुधात कॉर्नफ्लोर, मिल्क पावडर, GMS पावडर, Stabilizer पावडर व साखर मिक्स करून गरम दुधात हळूहळू ओता व मिक्स करून हलवत रहा. दुध चांगले गरम झाले की थंड करायला ठेवा. मग डीप फ्रीजमध्ये ७-८ तास सेट करायला ठेवा.
Praline घरी कसे बनवायचे: नॉनस्टिक तव्यावर साजूक तूप गरम करून त्यामध्ये साखर घालावी व मध्यम आचेवर साखर डार्क ब्राऊन होई परंत गरम करावी मग त्यामध्ये बदाम व काजूचे तुकडे घालून मिक्स करावे व थंड करायला ठेवावे. थंड झाल्यावर त्याचे तुकडे करावे.
बेस सेट झाल्यावर आपल्याला जेव्हा आईसक्रिम बनवायचे आहे तेव्हा डीप फ्रीज मधून बाहेर काढून जेव्हडे आईसक्रिम बनवायचे तेव्हडाच बेस घ्या. (जर निम्मा बेस घेतला तर ६ जणासाठी आईसक्रिम बनते.) आईस्क्रीम बनवताना बेसचे तुकडे करून घ्या.
आईसक्रिम बनवतांना एका अलुमिनीयम च्या भांड्यात बेस घेवून त्यामध्ये मध, क्रीम, पिवळा रंग, बटरस्कॉच ईसेन्स घालून पाच मिनिट ब्लेंडरने ब्लेंड करून त्यामध्ये Praline घालून मिक्स करून मग डीप फ्रीजमध्ये २ तास सेट करायला ठेवावे.
आईसक्रिम सेट झाल्यावर वरतून Praline ने सजवावे मग सर्व्ह करावे.