व्ह्नीला आईसक्रिम: आईसक्रिम म्हंटले की सर्वांना खूप आवडते. आईसक्रिम खाण्याचा किंवा बनवण्याचा काही काळ नसतो. वर्षभर आईसक्रिम बनवले व खाल्ले जाते. आईसक्रिममध्ये विविध प्रकार आहेत. आईसक्रिमचा कोणताही प्रकार छान लागतो.
मी बेसिक आईसक्रिम बनवून त्याचा पाहिजे तो प्रकार बनवते. एकदा बेसिक आईसक्रिम बनवले की आपल्याला झटपट कोणतेही आईसक्रिम बनवता येते. बेसिक आईसक्रिम बनवण्यासाठी मिल्क पावडर, कॉर्नफ्लोर, GMS पावडर, Stabilizer पावडर व साखर वापरली आहे.
आईसक्रिम म्हंटले की लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा खूप आवडते. हेच आईसक्रिम आपण घरी बनवले तर किती छान होईल. स्वस्त व मस्त आईसक्रिम घरी बनवता येते व तसेच बाहेरच्या पेक्षा सुद्धा छान बनवता येते.
बेसिक आईसक्रिम बनवले की आपल्याला व्ह्नीला, बटरस्कॉच, चॉकलेट, फळांचे, Strawberry व बऱ्याच प्रकाराची आईसक्रिम बनवता येतात.
The English language version of the same Ice-Cream preparation method can be seen here- Delicious Homemade Vanilla Ice-Cream
बेसिक आईसक्रिम बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
बेसिक आईसक्रिम सेट करण्यासाठी वेळ: ७-८ तास
व्ह्नीला आईसक्रिम बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
व्ह्नीला आईसक्रिम सेट करण्यासाठी वेळ: २-३ तास
वाढणी: ६ जणासाठी
साहित्य:
बेसिक आईसक्रिम:
२ कप दुध (गाईचे)
५ टे स्पून साखर
२ टे स्पून मिल्क पावडर
१ १/२ टे स्पून कॉर्नफ्लोर
१ १/२ टे स्पून GMS पावडर
१/४ टी स्पून Stabilizer पावडर
व्हानीला आईसक्रिम:
१/२ कप फ्रेश क्रीम
१/४ टी स्पून व्हनीला इसेन्स
कृती:
एक कप दुध तापवायला ठेवा. उरलेल्या दुधात साखर, मिल्क पावडर, कॉर्नफ्लोर, GMS पावडर, Stabilizer पावडर घालून मिक्स करून गरम करत ठेवलेल्या दुधात मिक्स करून पाच मिनिट दुध मंद विस्तवावर हलवत गरम करून घ्या. मिश्रण गरम झाल्यावर थंड करायला ठेवा. थंड झाल्यावर डीप फ्रीझमध्ये ७-८ तास सेट करायला ठेवा.
बेसिक आईसक्रिम सेट झाल्यावर बाहेर काढून त्याचे तुकडे करून त्यामध्ये क्रीम व व्हनीला इसेन्स घालून ब्लेंडरने ५ मिनिट ब्लेंड करून घ्या. मग डीप फ्रीजमध्ये परत २-३ तास सेट करायला ठेवा.
व्ह्नीला आईसक्रिम सर्व्ह करतांना चॉकलेट सॉस किंवा Strawberry सॉसने सजवून द्या.