डाळीचे सूप: डाळीचे सूप हे लहान मुलांना द्यायला चांगले आहे. हे सूप बनवतांना तुरीची किंवा मसूरची डाळ वापरली आहे. तसेच बनवतांना टोमाटो, गाजर, व तांबडा भोपळा वापरला आहे. मुलांना जेव्हा बरे नसते तेव्हा ते खाण्यासाठी खूप त्रास देतात तेव्हा हे सूप बनवावे म्हणजे त्याचे पोट सुद्धा भरेल. ह्या सुपामध्ये भाज्या व डाळ आहे त्यामुळे ते पौस्टिक सुद्धा आहे.
The English language version of this Healthy Dal Soup is published here- Nourishing Dal Soup
बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: 2 मुले
साहित्य:
१ टे स्पून तुरीची डाळ किंवा मसूरची डाळ
१ छोट्या आकाराचा टोमाटो
१ छोटेसे गाजर
१” तांबडा भोपळा तुकडा
३ कप पाणी
मीठ व साखर चवीने
कृती:
तुरीची डाळ धुवून घ्या. टोमाटो, गाजर व भोपळा धुवून बारीक चिरून घ्या. कुकरमध्ये हे सर्व साहित्य एकत्र करून शिजवून घ्या. मग पाहिजे तर मिक्सरमध्ये काढून घेवून थोडे गरम करून सर्व्ह करा.