मँगो मलई कुल्फी किंवा आईसक्रिम: आंब्याचा सीझन चालू झाला की आपल्याला आंब्याचे विविध प्रकार बनवता येतात. आईस्क्रीम म्हंटले की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. कुल्फी अथवा आईस्क्रीम हे सर्वांचे आवडते आहे. आंब्याची कुल्फी ही खूप टेस्टी लागते तसेच बनवायला पण खूप सोपी आहे. आंब्याची कुल्फी बनवण्यासाठी खवा, मिल्क पावडर, फ्रेश क्रीम वापरले आहे त्यामुळे छान चव येते व कुल्फीमध्ये बर्फ तयार होत नाही. तसेच खव्याची टेस्ट खूप छान लागते. ही कुल्फी डेझर्ट म्हणून सुद्धा बनवता येते. आपल्याला घरच्या घरी छान आईसक्रिम पार्लर सारखी आमकी कुल्फी बनवता येते.
The English language version of the preparation method of this Kulfi recipe is published here- Delicious Mango Malai Kulfi
दुध आटवणे वेळ: १० मिनिट
कुल्फी बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४-६ जणासाठी
साहित्य:
१ कप खवा (dried milk)
२ कप म्हशीचे दुध (आटवून) (buffalo milk)
१ कप मिल्क पावडर (milk powder)
१ कप फ्रेश क्रीम (fresh cream)
१ कप आंब्याचा रस (mango pulp)
१ कप साखर (sugar)
२ चिमुट पिवळा खाण्याचा रंग (yellow color)
कृती:
दुध व साखर मिक्स करून दहा मिनिट आटवून घ्या व थंड करायला ठेवा.
आंब्याचा रस मिक्सरमध्ये ३० सेकंद ब्लेंड करून घ्या.
ब्लेंडर मध्ये आटवलेले दुध, मिल्क पावडर, फ्रेश क्रीम, आंब्याचा रस पिवळा रंग घालून ब्लेंड करून घेवून अलुमिनियमच्या भांड्यात अथवा डब्यात मिश्रण ओतून चार तास डीप फ्रीजमध्ये सेट करायला ठेवा. किंवा कुल्फीच्या मोल्ड मध्ये सेट करायला ठेवा.