मँगो सॉफटी आईसक्रिम: एप्रिल, मे महिना चालू झाला की सगळे आंब्याची वाट बघत असतात. आंब्याच्या रस असला की विविघ पदार्थ बनवता येतात. आमरस पुरी, आंब्याचा केक, आंब्याच्या पुऱ्या, आंब्याची करंजी, आंब्याचे मोदक, आमकी बर्फी, आंब्याचा मिल्क शेक, मँगो आईसक्रिम, तसेच कुल्फी बनवता येते. आपल्याला घरच्या घरी हे आंब्याचे पदार्थ बनवता येतात. मँगो सॉफटी बनवायला फार सोपी आहे व चविस्ट लागते. घरी बनवलेले आईसक्रिम तर छान होते व भरपूर बनते. मँगो सॉफटी आईसक्रिम डेझर्ट म्हणून किंवा घरी पार्टीसाठी सुद्धा बनवता येते.
The English language version of the preparation method of this Mango Ice Cream is published here- Homemade Mango Softy Ice Cream
बेसिक आईसक्रिम बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
फ्रीझिंगसाठी वेळ: ७ – ८ तास
मँगो सॉफटी आईसक्रिम बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी वेळ: २ तास
साहित्य:
बेसिक आईस्क्रीम बनवण्यासाठी
२ कप दुध (गाईचे)
१ १/२ टे स्पून कॉर्नफ्लोर
१ १/२ टे स्पुन G.M.S. पावडर
७ टे स्पून साखर
१/८ टी स्पून स्टॅबिलायझर पावडर
२ टे स्पून मिल्क पावडर
आंब्याचे मऊ आईसक्रिम बनवण्यासाठी
२ हापूस आंबे (किंवा १ कप आंब्याचा रस)
२ चिमुट पिवळा रंग
१/२ कप फ्रेश क्रीम
कृती:
बेसिक आईस्क्रीम बनवण्यासाठी
जाड बुडाच्या भांड्यात १ कप दुध मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. राहिलेल्या दुसऱ्या एक कप दुधात कॉर्नफ्लोर, G.M.S. पावडर, साखर, स्टॅबिलायझर पावडर, मिल्क पावडर घालून मिक्स करून गरम करत ठेवलेल्या दुधात मिक्स करा व परत मिश्रण पाच मिनिट मंद विस्तवावर गरम करायला ठेवा. मिश्रण चांगले गरम झाले की थंड करायला बाजूला ठेवा. मिश्रण थंड झाले की डीप फ्रीजमध्ये सात ते आठ तास सेट करायला ठेवा.
आंब्याचे मऊ आईसक्रिम कसे बनवायचे
आंब्याचा जूस किंवा पल्प बनवण्यासाठी: आंबे धुवून, साले काढून त्याच्या लहान-लहान फोडी करून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या.
दुधाचे मिश्रण, आंब्याचा पप्ल किंवा आंब्याचा रस, पिवळा रंग, फ्रेश क्रीम एका भांड्यात घेवून ब्लेंडरने ३-४ मिनिट ब्लेंड करून घ्या. एका अलुमिनीयमच्या भांड्यात अथवा सपाट डब्यात हे मिश्रण ओतून डीप फ्रीजमध्ये दोन तास सेट करायला ठेवा.
आंब्याचे आईस्क्रीम सर्व्ह करतांना वरतून आंब्याच्या छोट्या फोडी घालाव्यात छान लागतात.
टीप: आंब्याचा दिवसात ताजे आंबे वापरून हे आईस्क्रीम बनवावे चव अप्रतीम लागते.
बेसिक आईस्क्रीम बनवलेकी आपल्याला जो पाहिजे तो फ्लेवर बनवता येतो.