कोळंबीचा पराठा: कोलंबीचा पराठा हा छान स्पायसी व टेस्टी लागतो. हा पराठा झटपट होतो. नाश्त्याला किंवा जेवणासाठी सुद्धा बनवता येतो. प्रॉन पराठा बनवतांना त्यामध्ये कांदा व बटाटा उकडून सोलून किसून घातला आहे त्यामुळे पराठा बनवतांना सारण चांगले मिळून येते. तसेच कोलंबी थोडी मिक्सरमध्ये बारीक केली आहे.
The English language version of the preparation method of this Paratha can be seen here- Maharashtrian Style Prawns Stuffed Paratha
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ६ पराठे
साहित्य:
आवरणासाठी:
२ कप मैदा
१ कप गव्हाचे पीठ
मीठ चवीने
भरण्यासाठी:
२ कप छोटी कोलंबी (सोलून)
१ मोठा बटाटा (उकडून, सोलून)
१ टे स्पून तेल
१ मोठा कांदा (किसून)
१/२ टे स्पून आले (किसून)
१/४ टी स्पून हळद
३ हिरव्या मिरच्या
१/४ टी स्पून कोथंबीर (चिरून)
१ टी स्पून गरम मसाला
मीठ चवीने
कृती:
आवरणासाठी: मैदा, गव्हाचे पीठ, मीठ व पाणी मिक्स करून घट्ट पीठ मळून बाजूला ठेवा.
कांदा किसून घ्या. बटाटा उकडून, सोलून किसून घ्या, हिरवी मिरची बारीक चिरून घ्या व आले किसून घ्या. कोळंबी थोडी शिजवून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
सारणासाठी: एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये किसलेला कांदा, आले, हिरवी मिरची मऊ होई परंत परतून घ्या. मग त्यामध्ये बारीक केलेली कोलंबी घालून मीठ, हळद, कोथंबीर, गरम मसाला व बारीक केलेली कोलंबी घालून परतून घ्या. थोडे कोरडे झालेकी त्याचे ६ भाग करा.
मळलेल्या पीठाचे १२ गोळे बनवून घ्या. दोन गोळे पुरी सारखे लाटून त्यामध्ये कोलंबीच्या मिश्रणाचा एक भाग ठेवून त्यावर लाटलेली दुसरी पुरी ठेवून सर्व बाजूनी दाबून पराठा लाटून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करून पराठा तेलाचा हात लावून चांगला भाजून घ्या.
गरम गरम पराठा सर्व्ह करा.