टोमॅटोचे औषधी गुणधर्म: टोमॅटो चा जसा भाजी म्हणून उपयोगी आहे तसेच फळभाजी म्हणून सुद्धा उपयोगी आहे. टोमॅटोमध्ये महत्वाचे घटक आहेत ते म्हणजे लोह, क्षार, साईट्रिक असिड जास्त प्रमाणात आहे ते आपल्या शरीरात उपयोगी आहे. टोमॅटोमध्ये जीवनसत्व “ए”, “बी” व “सी” हे भरपूर प्रमाणात आहे.
टोमॅटोचे सेवन हे लिव्हर व आपल्या इतर आवयवासाठी महत्वाचे कार्य करते. टोमॅटोच्या सेवनाने आपल्या रक्तातील उत्साह वाढवणारा गुणधर्म आहे. असे म्हणतात की “Apple a day keeps the doctor away” तसेच टोमॅटोला सुद्धा “Tomato a day keeps the doctor away” म्हणतात. रोज एक टोमॅटोचे सेवन केल्याने तुम्हाला डॉक्टरची गरज भासणार नाही.
टोमॅटोमध्ये पोषक घटक भरपूर आहेत त्यामुळे आपण भाजीमध्ये सरास वापर करू शकतो. टोमॅटोचा वापर केल्याने भाजी आमटीला छान चव येते, आंबट गोड, स्वादिस्ट लागते. तसेच हिरवे टोमॅटो सुद्धा चवीला चांगले लागतात त्याची भाजी खूप छान लागते व ते पचनाला सुद्धा हलके असतात.
टोमॅटोची कोशिंबीर, सार, सूप, चटणी, भाजी, सॉस बनवला जातो. पिकलेल्या टोमॅटोच्या रसात पुदिना, जिरे व मसाला घालून उकळून स्वादिस्ट चटणी बनते,
पिकलेल्या लाल टोमॅटोमध्ये आपल्याला पोषक असणारे घटक असतात त्याने आपल्या रक्तातील रक्त कण वाढतात. टोमॅटोच्या सेवनाने जेवणात रुची निर्माण होते. पचन शक्ती वाढते, रक्त विकार दूर होण्यास मदत होते. गर्भवती स्त्रियांना टोमॅटो हा गुणकारी आहे त्याची मानसिक शक्ती वाढून शक्ती वर्धक आहे. टोमॅटोचा रस हा आंबट, पाचक, रुचकर आहे. ज्यांना मूळव्याध, पांडुरोग आहे त्यांना टोमॅटो गुणकारी आहे.
टोमॅटोचे सूप बनवतांना त्यामध्ये साखर व मीठ घातल्यामुळे पिक्त विकार दूर होण्यास मदत होते. पिकलेल्या टोमॅटोचा रस अथवा सूप सेवन केल्याने आतड्याचे विकार नाहीसे होतात. पिकलेल्या टोमॅटो ताजा रस लहान मुलांना रोज दिवसातून दोन वेळा दिल्याने मुले निरोगी, बलवान बनतात.
टोमॅटोचे जसा गुणकारी आहे तसाच ज्यांना मुतखडा, सूज, संधीवात व आमवात आहे त्यानी टोमॅटोचे सेवन करू नये. जुलाब होत असतील तेव्हा टोमॅटोचे सेवन करू नये.