पुदिना (मिंट) चटणी: पुदिना म्हंटले की छान हिरवी गार त्याची पाने डोळ्या समोर येतात. पुदिन्याच्या पानाचा सुगंध खूप छान येतो. पुदिन्याचा पराठा पण चांगला लागतो. पुदिन्याची चटणी इडली, डोसा, वडा, कबाब बरोबर छान लागते. बनवायला अगदी सोपी व झटपट होते. पुदिन्याच्या सेवनाने तोंडाला चव येते व अनेक रोगांवर गुणकारी आहे. तसेच पुदिन्यामध्ये जीवनसत्व “ए” भरपूर असते.
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप ओला नारळ
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१/४ कप पुदिना पाने (चिरून)
७-८ लसून पाकळ्या
३ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून लिंबूरस
१/२ टी स्पून साखर
मीठ चवीने
कृती
खोवलेला नारळ, कोथंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, लसूण, लिंबूरस, साखर, मीठ १/४ कप पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.