उपवासाचा बटाटेवडा: उपवास म्हटल की आपल्याला साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, रताळ्याचे पदार्थ डोळ्या समोर येतात. तेचते पदार्थ खाऊन कंटाळा सुद्धा येतो. उपवासाच्या दिवशी काही चटपटीत पदार्थ खावासा वाटतो. उपवासाचा बटाटेवडा ही एक छान व सर्वांना आवडणारी डीश आहे. करून पहा सर्वांना नक्की आवडेल. बटाटेवडा ही सर्वाची आवडती व लोकप्रिय डीश आहे. उपवासाचा बटाटेवडा ही तर छान चवीस्ट डीश आहे.
The English language version of this Maharashtrian Fasting Dish can be seen here- MaharashtrianUpavasacha Batata Vada
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
सारणासाठी:
६ मध्यम आकाराचे बटाटे
४ हिरव्या मिरच्या
१/२” आले तुकडा
१ टी स्पून लिंबूरस
१/४ कप कोथंबीर (चिरून)
मीठ व साखर चवीने
आवरणासाठी:
एक कप वरईचे पीठ
एक कप शिंगाडा पीठ
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टे स्पून तेल (गरम करून)
मीठ चवीने
तेल किंवा तूप बटाटेवडा तळण्यासाठी
कृती
बटाटे उकडून सोलून कुस्करून घ्या. हिरवी मिरची व आले पेस्ट करून घ्या.
उकडलेल्या बटाट्या मध्ये आले-हिरवी मिरची पेस्ट, चिरलेली कोथंबीर, लिंबूरस, मीठ घालून मिक्स करून त्याचे ८-१० चपट्या आकाराचे गोळे बनवा.
वरईचे पीठ, शिंगाड्याचे पीठ, गरम तेल, लाल मिरची पूड, मीठ घालून भज्याच्या पीठा प्रमाणे भिजवून घ्या.
कढईमधे तेल अथवा तूप गरम करून घ्या. बटाट्याचा एक गोळा घेवून पीठामध्ये घोळून गरम तेलात सोडा व छान खरपूस वडे तळून घ्या. असे सर्व वडे बनवून घ्या.
गरम गरम बटाटेवडे नारळाच्या चटणी बरोबर सर्व्ह करा.