पांढरा ढोकळा: पांढरा ढोकळा हा नाश्त्याला किंवा स्टारटर म्हणून बनवायला छान आहे. हा ढोकळा बनवतांना तांदूळ व उडीदडाळ वापरली आहे. तसेच वरतून मिरी पावडर व लाल मिरची वापरली आहे. ह्यामध्ये तेलाचा वापर फक्त थाळीला लावण्यासाठी केला आहे. बनवायला सोपा व लवकर होणारा पदार्थ आहे. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहे.
The English language version of this Dhokla Recipe can be seen here- Safed Dhokla
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य
१ कप तांदूळ
१/२ कप उडीदडाळ
१ टी स्पून मिरे पावडर
१ टी स्पून लाल मिरची पावडर
एक चिमुट खायचा सोडा
मीठ चवीने
१ टी स्पून तेल थाळीला लावायला
कृती
तांदूळ व उडीदडाळ धुवून वेगवेगळी ७-८ तास भिजत ठेवा.
तांदूळ व उडीदडाळ घट्ट व बारीक वाटुन घेऊन मिश्रण ७-८ तास झाकून ठेवा.
वाटलेले मिश्रण, मीठ व खायचा चिमुटभर सोडा घालून चांगले ढवळून घ्या.
एका पसरट भांड्याला तेलाचा हात लावून तयार केलेले मिश्रण ओतुन वरतून मिरे पावडर व लाल तिखट भुरभुरून घ्या.
कुकरमध्ये पाणी घालून एका भांडे ठेवा त्यावर मिश्रणाचे भांडे ठेवून कुकरची शिट्टी काढून झाकण लाऊन कुकर बंद करून १०-१२ मिनिट वाफवून घ्या.
कुकर मधून भांडे बाहेर काढून थोडेसे थंड झाल्यावर ढोकल्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.
गरम गरम पांढरा ढोकळा टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.