दोडक्याच्या शिरांची चटणी: दोडक्याच्या शिरांची चटणी ही चवीस्ट लागते. आपण दोडक्याची भाजी बनवतांना दोडक्याची साले काढून टाकतो. तिचे साले काढून टाकण्याच्या आयवजी ती वापरून त्याची चटणी बनवावी. दोडक्याच्या शिराह्या पौस्टिक आहेत. ही चटणी बनवतांना दोडके ताजे वापरावेत. दोडक्याची चटणी गरम गरम भाकरी बरोबर छान लागते.
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
एक कप दोडक्याच्या शिरा
अर्धा कप सुके किसलेले खोबरे
पाव कप तीळ
दहा हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी
एक टे स्पून तेल
एक टी स्पून मोहरी
एक टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
मीठ व साखर चवीने
कृती
दोडक्याची साले किसून घ्यावीत. हिरव्या मिरच्या चिरून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग घालून हिरव्या मिरच्या घालून थोडे परतून घ्या.
गरम गरम भाकरी बरोबर दोडक्याची चटणी सर्व्ह करावी.
मग त्यामध्ये दोडक्याचा कीस घालून चांगला परतून घ्या. दोडक्याचा कीस परतून झाल्यावर त्यामध्ये सुके खोबरे व तीळ घालून खमंग भाजावे. शेवटी साखर व मीठ घालून मिक्स करावे.
झटपट बटाट्याचा रस्सा: बटाटे म्हंटले की बटाट्याचे नानाविध प्रकार करता येतात. बटाट्याची कोणत्याही प्रकारची भाजी अथवा रस्सा छानच लागतो. बटाट्याचा झटपट रस्सा बनवायला अगदी सोपा आहे. आपल्याकडे अचानक पाहुणे आले असतील तर हा रस्सा बनवायला अगदी छान आहे. तसेच हा रस्सा चवीस्ट लागतो. अश्या प्रकारचा रस्सा लहान मुलांना खूप आवडतो तिखट नसल्यामुळे मुले आवडीने खातात. साजूक तुपाची फोडणी दिल्यामुळे चव सुंदर लागते.