चिकन खिम्याचे थालीपीठ: खिम्याचे थालीपीठ हे नाश्त्याला किंवा जेवणात सुद्धा करता येते, आपण नेहमी भाजणीचे थालीपीठ बनवतो, खिम्याचे थालीपीठ बनवून बघा. हे थालीपीठ टेस्टी व छान खमंग लागते.
The English language version of the preparation method of this Thalipeeth recipe can be seen here- Tasty Chicken Kheema Thalipeeth
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
५०० ग्राम चिकनचा खिमा
१ टे स्पून आले (पेस्ट)
१ टे स्पून लसूण (पेस्ट)
५ हिरव्या मिरच्या (चिरून)
२ मोठे कांदे (बारीक चिरून)
१ टे स्पून लिंबूरस
१ कप बेसन
१/२ कप रवा
१ टी स्पून काळी मिरी पावडर
१ टी स्पून जिरे पावडर
मीठ चवीने
१ चिमुट खायचा सोडा
१/४ कप तूप
कृती:
खिमा धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवा. कढईमध्ये एक टे स्पून तूप गरम करून कांदा, आले, लसूण, हिरवी मिरची, मीठ घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये खिमा घालून २-३ मिनिट परतून घेवून त्यामध्ये १/२ कप पाणी घालून चांगला शिजवून घ्या. लिंबूरस घालून परत थोडा परतून घ्या.
खिमा थंड झाल्यावर त्यामध्ये मिरे पावडर, जिरे पावडर, बेसन, रवा, मीठ व एक चिमुट खाण्याचा सोडा घालून मळून घ्या. मळलेल्या पीठाचे आठ एक सारखे गोळे बनवा.
तवा गरम करायला ठेवा त्यावर थोडे तूप लावा. पिठाचा एक गोळा घेवून प्लास्टिक पेपरवर थापून मग तव्यावर थालीपीठ घालून कडेनी तूप सोडून थालीपीठ छान दोनी बाजूनी खमंग भाजून घ्या.
गरम गरम खिम्याचे थालीपीठ सर्व्ह करा.