सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद: आपण नेहमी रव्याचा शिरा बनवतो. व बऱ्याच वेळा जसा प्रसादा साठी शिरा बनवतो तसा बनवतो. पण प्रसादासाठी जो शिरा बनवला जातो त्याची चव व सुगंध निराळीच असते.
The video in Marathi for making this सत्यनारायण पूजेचा शिरा प्रसाद Satyanarayan Puja Sheera Prasad at home can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=Ij7vmuB2ODI
The English language version of this recipe can be seen here- Sheera for Satya Narayan Puja
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: 30-३५ लोकांना प्रसाद पुरतो
साहित्य:
२ कप जाड रवा
२ कप साखर
२ कप साजूक तूप
२ कप दुध १ १/२ कप पाणी
२ केळी (काप करून)
२ टी स्पून वेलचीपूड
१० बदाम व काजू (प्रतेकी)
५० ग्राम मनुके
कृती
मोठ्या कढईमध्ये तूप गरम करून रवा घालून मिक्स करून घेऊन मंद विस्तवावर बदामी रंगावर खमंग भाजून घ्या.
दुध व पाणी मिक्स करून गरम करायला ठेवा. पाणी व दुध चांगले गरम झाले पाहिजे. रवा भाजून झाल्यावर त्यामध्ये चिरलेले केळे घालून परत थोडे परतून घ्या.
रवा परतून झाल्यावर त्यामध्ये हळूहळू उकळलेले दुध-पाणी घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवा व चांगल्या दोन वाफा येऊ द्या. म्हणजे रवा चांगला फुलून येईल.
रवा चांगला शिजला की त्यामध्ये साखर घालून मिक्स करून मंद विस्तवावर परत झाकण ठेऊन वाफ येऊ द्यावी. मग त्यामध्ये वेलचीपूड, काजू-बदाम, बेदाणे घालून मिक्स करावे.
टीप: प्रसादाचा शिरा बनवतांना चांगल्या प्रतीचा जाड रवा वापरावा. म्हणजे शिरा छान मोकळा होतो. रवा चांगला खमंग भाजला गेला पाहिजे नाहीतर शिरा चिकट होतो.
रवा भाजून झाल्यावर केळ्याचे काप घालून परत रवा थोडा भाजावा म्हणजे शिऱ्याला केळ्याचा वास चांगला येतो.
दुध व पाणी मिक्स करून उकळल्याने शिरा चांगला होतो व रवा पण चांगला शिजतो.
प्रसादासाठी शिरा बनवतांना तुपाचे प्रमाण जास्तच हवे म्हणजे शिरा चांगला होतो तसेच मोकळा सुद्धा होतो.
खर म्हणजे प्रसादाचा शिरा बनवण्यासाठी सव्वा किलो रवा, सव्वा किलो साखर, सव्वा किलो तूप हे प्रमाण आहे. पण आपल्याला लहान प्रमाणात करायचा असेल तर हे प्रमाण वापरावे.
सत्यनारायण पूजेच्या वेळी प्रसाद ठेवतांना वरतून काजू-बदाम, मनुके घालून सजवावे व तुळशीची पाने ठेवावीत.
The video in Marathi for making this सत्यनारायण पूजेचा शिरा प्रसाद Satyanarayan Puja Sheera Prasad at home can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=Ij7vmuB2ODI