शेजवान इडली: शेजवान म्हंटले की आपल्याला चायनीज पदार्थ डोळ्या समोर येतात. शेजवान इडली ही एक छान नाश्त्यला बनवण्यासाठी डीश आहे. जर जास्तीची इडली राहिली किंवा ताज्या इडलीची पण शेजवान इडली बनवता येईल. लहान मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला ही इडली ची डीश मस्त आहे. त्यामुळे मुले भाजीपण खातात व शेजवान सॉस मुळे इडली पण टेस्टी लागते.
The English language version of this Chinese Style Idli can be seen here – Tasty Schezwan Idli
बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट
वाढणी: २ जणांसाठी
साहित्य:
१० इडल्या
१ लहान कांदा
१ लहान गाजर
१ छोटी शिमला मिर्च
१/४ कप कोबी
२ टे स्पून मटार दाणे
२ श्रावण घेवडा
१/४ कप कोथंबीर
१ टे स्पून शेजवान सॉस
मीठ चवीने
कृती:
शिमला मिर्च, गाजर, कांदा, श्रावण घेवडा, कोबी लांबट उभ्या कापून घ्या. कोथंबीर चिरून घ्या. इडलीचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करा.
कढईमध्ये तेल गरम करून कांदा, शिमला मिर्च, गाजर, श्रावण घेवडा, कोबी, मटार घालून दोन मिनिट मध्यम आचेवर परतून घ्या. मग त्यामध्ये थोडेसे मीठ व शेजवान सॉस घालून एक मिनिट परतून घ्या.
भाज्या परतून झाल्यावर त्यामध्ये इडलीचे तुकडे घालून दोन-तीन मिनिट परतून घ्या. कोथंबीर घालून मिक्स करा.
गरम गरम शेजवान इडली सर्व्ह करा.
टीप: मीठ जरा कमीच घाला कारण की शेजवान सॉस मध्ये व इडली मध्ये सुद्धा मीठ असते.