बटाट्याच्या वड्या: बटाट्याच्या वड्या ह्या छान चविस्ट लागतात. ह्या वड्या बनवायला सोप्या आहेत. बटाट्याच्या वड्या खमंग लागतात. आपण नेहमीच नारळाच्या वड्या बनवतो. ह्या वड्या बनवतांना उकडलेला बटाटा वापरला आहे.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ३५-४० वड्या बनतात
साहित्य:
एक छोटा नारळ (खोऊन)
दोन मोठे बटाटे (उकडून व सोलून)
एक कप साखर
एक कप दुध
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ टी स्पून जायफळ पूड
दोन टे स्पून पिठीसाखर
१ टी स्पून तूप
कृती:
नारळ खोऊन घ्या. बटाटे उकडून, सोलून व किसून घ्या.
एका कढईमधे दुध गरम करून त्यामध्ये खोवलेला नारळ घालून दुध आटे परंत शिजवून घ्या. मग त्यामध्ये साखर व किसलेला बटाटा घालून मिश्रण अगदी घट्ट होई परंत शिजवून घ्या. मिश्रणाला छान गुलाबी रंग येईल. मग त्यामध्ये वेलचीपूड व जायफळ पूड घालून मिक्स करून घ्या. नंतर मिश्रणामध्ये दोन टे स्पून पिठीसाखर घालून हलवा म्हणजे छान घट्ट गोळा होईल.
एका मध्यम आकाराच्या खोलगट थाळीला तूप लाऊन मिश्रणाचा गोळा थाळी मध्ये एक सारखा थापून घ्या. थंड झाल्यावर वड्या कापून घ्या.