उपवासाचे चटपटीत दाणे: उपवासासाठी हे दाणे बनवायला छान आहेत.फोडणीचे दाणे हे जेवतांना तोंडी लावायला छान आहेत इतर वेळेस सुद्धा हे चटपटीत दाणे खायला चांगले लागतात. फोडणीचे दाणे बनवायला अगदी सोपे आहेत व लवकर होणारे आहेत. मुलांना आपण शेगदाणे लाडू बनवून देतो तसेच हे दाणे लहान मुले आवडीने खातात.
The English language version of these Peanuts for Fasting recipe preparation method can be seen here – Peanuts for Fasting Days
बनवण्यासाठी वेळ: १५-२० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप शेगदाणे
2 टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
१/४ कप खोबरे (ओला नारळ खोऊन)
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ लिंबू (रस काढून)
फोडणी करीता:
१ टे स्पून तूप
१ टी स्पून जिरे
कृती:
शेगदाणे भाजून त्याची साले काढून पाखडून घ्या.
शेगदाण्याला पाण्याचा हबका मारून लाल मिरची पावडर, मीठ लाऊन १०-१२ मिनिट बाजूला ठेवा.
कढई मध्ये तूप गरम करून जिरे फोडणीमध्ये घालून तिखट-मीठ लावलेले शेगदाणे घालून चांगले परतून घ्या.
गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करतांना खोवलेले खोबरे, कोथंबीर, लिंबूरस घालून मिक्स करून सर्व्ह करा.