उपवासाची खजुराची कचोरी: उपवासाची कचोरी ही एक छान डीश आहे. उपवास असला की आपण नेहमी त्याच त्याच डीश बनवतो ही एक चं ड्रायफ्रुट घालून बनवलेली डीश आहे.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १२ कचोरी बनतात
साहित्य कचोरि भरण्यासाठी:
२० खजूर
१ टे स्पून खस-खस
६ जरदाळू (बारीक तुकडे करून)
१ टी स्पून वेलचीपूड
१ टे स्पून काजू पावडर
आवरणसाठी :
१ वाटी शिंगाडा पीठ वाटी
१/२ वाटी साबुदाणा पीठ
१ टे स्पून तेल (मोहन साठी)
१ टी स्पून तीळ, मीठ
तळण्यासाठी तेल/तूप
कृती :– खजूर धुऊन बिया काढून मिक्सर मधून काढा. जरदाळूचे बारीक तुकडे करा. नंतर खजूर, जरदाळू, खस-खस, वेलचीपूड व काजू पावडर घालून गोळा बनवून घ्या. पोळपाटा वरती लाटून त्रिकोणी तुकडे करा.
शिंगाडा पीठ, साबुदाणा पीठ, गरम तेल, मीठ व थोडे कोमट पाणी घेऊन घट्ट पीठ मळून घ्या. त्याचे छोटे-छोटे गोळे करून लाटून त्याला त्रिकोणी आकार द्या. प्रत्येक त्रिकोणा मध्ये खजुराचा त्रिकोण ठेवून तीनही बाजूनी बंद करा.
कढई मध्ये तेल/ तूप गरम करून कचोरी गुलाबी रंगावरती तळून घ्या.
Please add recipe for ‘CHIROTA’ & ‘KADBOLI’ , the maharashtrian Faral item.
The recipe for Kadboli can be seen here – https://www.royalchef.info/2016/10/crispy-and-spicy-kadboli-for-diwali-faral.html
The recipe for Chirote can be seen here – https://www.royalchef.info/2011/10/recipe-for-chirote.html