ऑरेंज मेलडी: ऑरेंज मेलडी हे थंड पेय आहे. ऑरेंज मेलडी बनवण्यासाठी संत्री, लिंबूरस व आलेरस वापरला आहे. संत्र्यामध्ये व लिंबू मध्ये व्हिटामीन सी हे भरपूर असते. ऑरेंज मेलडी मुळे आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. हे बनवण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो. लहानमुले आवडीने पितात.
The English language version of this soothing fresh orange juice recipe preparation method can be seen here – Tasty Orange Melody Fruit Juice
बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट
थंड करण्यासाठी वेळ: २ तास
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
६ मोठ्या आकाराची संत्री
१/२ कप पाणी
१” आले तुकडा
१/२ कप साखर
२ लिंबूरस
१०-१२ बर्फाचे तुकडे
२ कप थंड पाणी किंवा सोडा
सजावटीसाठी पुदिना पाने व संत्र्याच्या फोडी
कृती: संत्र्याचा रस काढून घ्या. आले किसून त्यामध्ये १/२ कप पाणी घालून मिक्सरमध्ये वाटून गळून घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात आले रस, साखर व १/२ कप पाणी घालून विरघळवून घेवून दोन मिनिट मंद विस्तवावर गरम करून घ्या. मग थंड करायला बाजूला ठेवा.
मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये ऑरेंज ज्यूस, लिंबूरस घालून थंड करायला फ्रीजमध्ये ठेवा.
सर्व्ह करतांना निम्मा ग्लास भरून त्यामध्ये बर्फाचे तुकडे घाला व वरतून १/२ कप थंड पाणी अथवा सोडा घाला. मग त्यावर पुदिना पाने व संत्र्याच्या फोडीने सजवा मग सर्व्ह करा.