स्वीट कॉर्न मोदक: मोदक म्हंटले की गणपती बाप्पांचा आवडता पदार्थ होय. मोदक बनवतांना आपण विविध प्रकारचे सारण बनवून मोदक बनवू शकतो. स्वीट कॉर्न मोदक छान टेस्टी लागतात. हे मोदक सणावाराला सुद्धा बनवता येतात.
The English language version of these Sweet Modaks recipe and preparation method can be seen here- Tasty Sweet Corn Modak
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २० मोदक
साहित्य:
मोदकाच्या सारणासाठी:
२ कप स्वीट कॉर्न (किसून)
१/४ कप तूप
२ कप दुध
१ कप साखर
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ टी स्पून केशर (दुधात भिजवून)
मोदकाच्या आवरणासाठी:
२ कप मैदा
१/२ कप रवा
१/४ कप तूप (गरम)
तूप मोदक तळण्यासाठी
कृती:
सारणासाठी: एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये किसलेले स्वीट कॉर्न घालून रंग बदले परंत परतून घ्या. मग त्यामध्ये दूध व साखर घालून घट्ट होई परंत आटवून घ्या. नंतर त्यामध्ये वेलचीपूड व केशर घालून मिक्स करून मिश्रण थोडे कोरडे करून घ्या. मग त्याचे एक सारखे २० गोळे बनवा.
आवरणासाठी: मैदा, रवा व कडकडीत तुपाचे मोहन घालून मिक्स करून पाणी वापरून घट्ट पीठ मळून घेवून २० मिनिट बाजूला ठेवा. मग त्याचे २० एक सारखे गोळे बनवा. एक एक गोळा घेऊन पुरी सारखा लाटून त्यामध्ये एक कॉर्न चा गोळा ठेवून पुरीला मोदकाचा आकार द्या. असे सर्व मोदक बनवून घ्या.
कईमधे तूप गरम करून मोदक गुलाबी रंगावर तळून घ्या.