व्हरमिसाईल पन केक: व्हरमिसाईल म्हणजेच शेवयाचे डोसे होय. व्हरमिसाईल पन केक हे नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहेत. हे बनवायला सोपे आहेत तसेच पौस्टिक सुद्धा आहेत. ह्या मध्ये अंडे वापरण्याच्या आयवजी दही वापरले आहे. मिश्रण बनवून ते एक तास बाजूला ठेवले आहे त्यामुळे रवा छान फुलतो व पण केक छान होतात. आपण नेहमी गोड पण केक बनवतो पण हे निराळेच आहेत ह्यामध्ये हिरवी मिरची, कोथंबीर वापरली आहे. त्यामुळे ते थोडेसे तिखट व चवीस्ट लागतात.
The English language version of this Seviyan Dosa recipe and preparation method can be seen here- Vermicelli Pancakes
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ८ बनतात
साहित्य:
२ कप शेवया (चुरा)
२ कप रवा
५ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१ १/२ कप दही
१/२ कप कोथंबीर (चिरून)
१/२ कप नारळ (खोऊन)
१/४ कप तूप (वनस्पती)
१/४ टी स्पून हिंग
मीठ चवीने
तेल शालो फ्राय करण्यासाठी
कृती:
कढईमध्ये तूप गरम करून हिरवी मिरची घालून एक मिनिट फ्राय करून त्यामध्ये शेवया व रवा घालून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घेवून मग थंड करायला ठेवा. भाजलेल्या शेवया व रवा. दही, कोथंबीर, नारळ, हिंग, मीठ व पाणी घालून भजच्या पीठाप्रमाणे भिजवून एक तास तसेच झाकून ठेवा.
नॉनस्टिक तवा गरम करून घेवून तव्याला थोडेसे तेल लाऊन त्यावर १/४ कप मिश्रण ओतुन थोडे जाडसर पसरवून घ्या. मग दोनीही बाजूनी गुलाबी रंगावर भाजून घ्या.
गरम गरम पण केक पुदिना चटणी बरोबर सर्व्ह करा.